घरमुंबई‘राजसाहेब परप्रांतीय मासे विक्रेत्यांना हटवा’; कोळी भगिनींची कृष्णकुंजवर धाव

‘राजसाहेब परप्रांतीय मासे विक्रेत्यांना हटवा’; कोळी भगिनींची कृष्णकुंजवर धाव

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परप्रांतीय आपआपल्या गावी गेले होते. मात्र, आता अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर सर्व परप्रांतीय मुंबईत परतू लागले आहेत. सध्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स मोठ्या प्रमाणात सुरु झाली नसल्यामुळे परप्रातींय मासे विक्री करत आहेत. यामुळे स्थानिक कोळी लोकांना याचा त्रास होत आहे. याबाबतची तक्रार घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत कोळी भगिनींनी मदत मागितली आहे.

मुंबईतल्या डोंगरी भागातील कोळी भगिनींनी सोमवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. “राजसाहेब बेकायदा मासे विक्रेत्यांना हटवा, परप्रांतीय मासे विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने आमच्या पोटावर पाय येत आहे. आमचा व्यवसाय मंदावला आहे तुम्हीच काहीतरी मार्ग काढू शकता,” अशी विनंती या कोळी भगिनींनी केली आहे.

- Advertisement -

परप्रांतीय बेकायदा फेरीवाल्यांचा वावर डोंगरी परिसरात वाढला आहे. आम्ही परप्रांतीय बेकायदा व्यावसायिकांमुळे व्यवसाय करता येत नाही आहे. कोळी बाजाराच्या बाहेर अनधिकृत मासे विक्रेते आहेत. त्यांच्यामुळे आमच्या पोटावर पाय येत आहे तुम्ही या प्रकरणी तोडगा काढावा, अशी मागणी राज ठाकरे यांच्याकडे केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -