मुंबईतील झेन सदावर्तेला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर

महाराष्ट्रातील दोघा जणांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

New Delhi
mumbai girl zen sadavarte to receive bravery award to pm
मुंबईतील झेन सदावर्तेला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर

आज राष्ट्रीय शौर्य पुरस्कार घोषित केले आहेत. महाराष्ट्रातील दोघांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. झेन सदावर्ते आणि आकाश किल्लारे या दोघांना शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहे. मुंबईतील क्रिस्टल टॉवरच्या आगीदरम्यान झेन सदावर्ते हीने लोकांचे प्राण वाचवले होते. त्यामुळे तिला शौर्य पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. झेन सदावर्ते ही अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची मुलगी आहे.

झेन एक जबाबदार नागरिक म्हणून उदयाला यावी अशी नेहमीच आमची मनोकामना राहिली आहे. टाटा हॉस्पिटलमधील रुग्णाच्या मदतीला देखील ती धावून जाते. क्रिस्टल टॉवरमधल्या आगीत तिने १७ लोकांना वाचवले असून त्यामध्ये चार लोक मृत्यू पावले. यामध्ये तिने आग्रणी काम केलं होत. या सर्व बाबी लक्षात घेता सरकारने केलेलं कौतुक आणि शौर्य पुरस्कारच्या निमित्ताने सरकार तिचं आयुष्यभराचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी जबाबदारी घेतं आहे. हे पाहून वडील म्हणून मला मनस्वी आनंद आहे. मात्र त्यापेक्षा मला याचा आनंद आहे की, ती एक जबाबदार नागरिक म्हणून समोर येत आहे. – अॅड. गुणरत्न सदावर्ते (झेन सदावर्तेचे वडील)


हेही वाचा –  ‘नाईटलाइफ’च्या निर्णयावर मुख्यमंत्री म्हणतात…