घरमुंबईगोविंदांच्या सुरक्षेशी तडजोड नाही

गोविंदांच्या सुरक्षेशी तडजोड नाही

Subscribe

गोविंदा आणि सुरक्षा हा एक मोठा संवेदनशील आणि चर्चेचा विषय ठरला आहे. यंदाच्या वर्षी उंचीची मर्यादा जरी नसली तरी वयाची मर्यादा घालण्यात आली आहे. १४ वर्षांखालील मुले यात भाग घेऊ शकणार नाहीत. आयोजक आणि गोविंदा पथक यांनी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे

गोविंदा आणि सुरक्षा हा एक मोठा संवेदनशील आणि चर्चेचा विषय ठरला आहे. यंदाच्या वर्षी उंचीची मर्यादा जरी नसली तरी वयाची मर्यादा घालण्यात आली आहे. १४ वर्षांखालील मुले यात भाग घेऊ शकणार नाहीत. आयोजक आणि गोविंदा पथक यांनी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. या सोबतच सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक गोविंदाचा विमा असणे बंधनकारक आहे. यासाठी समन्वय समिती स्थानिक लोकप्रतिनिधींची भेट घेत आहे.

- Advertisement -

मुंबईत गेली काही वर्षे गोविंदा उत्सव जवळ आली की, त्याला राजकीय रंग चढतो. त्याचसोबत न्यायालयाच्या अटींचाही सामना करावा लागतो. राज्यात १५०० हून अधिक तर मुंबईमध्ये ९०० हून अधिक गोविंदा पथके आहेत. यावर्षी कोर्टाच्या आदेशानुसार सर्व गोविंदा पथके आणि आयोजकांनी विमा घेणे बंधनकारक आहे. गोविंदा पथकांना १० लाख रूपयांपर्यंतचा विमा काढता येणार आहे. प्रत्येकी ७५ रुपयांच्या हिशेबाने हा विमा देण्यात येणार आहे. यासोबतच पथकांनी आपल्या गोविंदांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, हार्नेसबेल्ट यांचा वापर करावा, असे आवाहन दहीहंडी समन्वय समितीकडून सर्व पथकांना करण्यात आले आहे.

गोविंदांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सवार्ंंनी योग्यती खबर घ्या. यासोबतच सर्व आयोजकांना आम्ही विनंती करतो की, गोविंदांसाठी सर्व सुरक्षा तसेच गर्दीचे व्यवस्थापन करा.
– बाळा पडेलकर, अध्यक्ष, दहीहंडी समन्वय समिती

- Advertisement -

बरेचदा आपली क्षमता नसतानाही अधिक थर लावायचा प्रयत्न केला जातो. आम्ही सर्व गोविंदा पथकांना आवाहन करतो की, जितकी क्षमता असेल तितकेच थर लावा.
– अरुण पाटील, कार्याध्यक्ष, दहीहंडी समन्वय समिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -