Live Rain Update: लोकलमध्ये अडकलेल्या २९० प्रवाशांची सुटका!

मुंबईसह उपनगरात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे

 

मुंबईत रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे दोन लोकल गाड्या अडकल्या आहेत. त्यामुळे सध्या अडकलेल्या प्रवाशांना बाहेर टाकण्यासाठी एनडीआरएफचे बचाव कार्य सुरू आहे.एकूण २९०  प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन
मुंबईत जरा जरी पाऊस झाला तरी आधी हिंदमाताला पाणी साचते. त्यामुळे सध्या मुंबईत सुरू असलेल्या मुलळधार पावसामुळे हिंदमता परिसर जलमय झाला आहे.मुंबई शहर आणि उपनगरामध्ये येत्या २४ तासांमध्ये पडणाऱ्या पावसामुळे पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होई शकते असा इशारा प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईमार्फत देण्यात आला आहे. मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देतानाच पूरस्थिती उद्भवू शकते असे प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईचे संचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्ट केले आहे.


मुसळधार पावसामुळे आझाद मैदान मार्ग बंद करण्यात आला आहे. याठिकाणी बेस्ट बसेसवर झाडे कोसळली आहेत.


#WATCH Maharashtra: Heavy rain lashes parts of Mumbai; visuals from near Churchgate. pic.twitter.com/F1Lcy4nRcD

— ANI (@ANI) August 5, 2020


केळवे रोड रेल्वे स्टेशनजवळ ट्रॅकवर पाणी 

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत असल्याने आज देखील मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे. थोड्या काळाच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरूवात झाली आहे. मुबईसह इतर भागात देखील पावसाने रात्रीपासूनच आपली बँटिंग सुरू ठेवल्याने केळवे रोड रेल्वे स्टेशनजवळ ट्रॅकवर पाणी साचल्याचे दिसून आले आहे.


सोमवारी रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसाने दुपार नंतर थोडी उसंत घेतली होती मात्र काल रात्रीपासून पुन्हा पाऊसाने जोरदार बरसण्यास सुरूवात केली आहे. आज देखील (५ ऑगस्ट) मुंबईसह उपनगरात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


येत्या २४ तासात कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आयएमडी, मुंबईने वर्तविली आहे. तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या मराठवाडा भागातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले आहे.


भिवंडीत पावसाने पाणी गटारातून ओसंडून वाहू लागले

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काल रात्रीदेखील जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे भिवंडीतील मंगल बाजार तसेच तीन बत्ती परिसरात पाणी साचले. मात्र ड्रेनेजची झाकणे वर येऊन हे पाणी ओसंडून वाहू लागले. त्यामुळे पाण्याच निचरा झाला नाही.


रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे सायन किंग सर्कलमधील भागात पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील विविध ठिकाणी पाणी साचल्याने मुंबईत सामान्यांचे जन-जीवन विस्कळीत झाले आहे. आयएमडी, मुंबईने आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.


मुंबईत आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई शहरात गेल्या १२ तासांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून १५० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस पडल्याने पश्चिम उपनगरावर अधिक परिणाम झाला आहे, असा अंदाज आयएमडी, मुंबईने व्यक्त केला आहे.


या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने समुद्र किनारे आणि किनाऱ्यालगत जाणे नागरिकाने टाळावे. तसेच एखाद्या ठिकाणी पाणी साचल्यास त्या ठिकाणीही जाणे टाळावे, अशा सूचना मुंबई पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे नागरिकांना करण्यात आले आहे.

दरम्यान पूर्वानुमानानुसार उत्तर खाडीमध्ये आज कमी दाब तयार होणार असून परिणामी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एकाचवेळी कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने आजही राज्यासह मुंबईत जोरदार पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


मुंबई, ठाणे आणि परिसराला मंगळवारी पावसाने झोडपून काढलं. पावसाचा हा जोर पुढचे तीन दिवस कायम राहणार आहे. पुणे वेधशाळेने हा इशारा दिला आहे. येत्या ७२ तासात कोकण, गोवा, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे.