पावसाचे साचलेले पाणी कमी होताच पुन्हा मध्य रेल्वेची ठराविक उपनगरीय लोकल सेवा सुरू करण्यात येणार…
Select suburban services @Central_Railway are likely to resume shortly as water starts receding@drmmumbaicr .
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) August 4, 2020
सांताक्रूझ पूर्व येथील त्रिमूर्ती चाळीच्या ३ खोल्यांचा भाग कोसळला
मुंबईतील सांताक्रूझ पूर्व येथील त्रिमूर्ती चाळीच्या ३ खोल्यांचा भाग आज सकाळी मुसळधार पावसाने कोसळला आहे. या चाळीच्या मागील बाजूस मागील बाजूस असलेल्या ओपन ड्रेन होते. यामध्ये खोलीत असणारे माणसं वाहून गेल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये १ महिला २ मुली बेपत्ता झाल्याचे सांगितले जात आहे. या परिसरात शोध मोहीम सुरू असून आणखी एका मुलीला वाचवण्यात यश आले असून पोलिसांनी तिला व्ही एन देसाई रुग्णालयात दाखल केले आहे.
#Mumbai: 1 female, 2 girls missing after they fell in an open drain, located at the backside of their room. 3 rooms of Trimurti Chawl in Santacruz East, collapsed today morning. Search operation underway. Another girl rescued by police and shifted to V N Desai hospital pic.twitter.com/T7SvACrgxV
— ANI (@ANI) August 4, 2020
महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मिठी नदी लगत असणाऱ्या कुर्ला परिसरातील क्रांतीनगर भागाची पाहणी करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुंबई शहरात कालपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याने आज आणि उद्या या दोन दिवसासाठी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून रेड अलर्ट जारी केला आहे.
#WATCH High tide hits #Mumbai as heavy rainfall continues to lash the city. The MeT department has sounded a red alert for today & tomorrow for an extremely heavy downpour. #Maharashtra pic.twitter.com/qrjUKWavdq
— ANI (@ANI) August 4, 2020
महापालिका क्षेत्रातील ठिकाणांना आयुक्तांनी दिली भेट
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल हे महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करत आहेत. या पाहणी दौऱ्या दरम्यान त्यांच्यासह अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरसू, महापालिका आयुक्तांचे उपायुक्त चंद्रशेखर चोरे, पायाभूत सुविधा विभागांचे संचालक संजय दराडे यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.
अतिवृष्टी इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी केली पाहणी
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाच्या व भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांसह महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी हिंदमाता ठिकाणी पाहणी केली आहे.
अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणा सुरू राहणार
सोमवारी रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई व उपनगरांतील सर्व शासकीय कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असे मदत व पुनर्वसन विभागाने कळविले आहे. हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला असून खबरदारी म्हणून शासकीय कार्यालये आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणा मात्र सुरूच राहणार आहेत.
मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील मराठा कॉलनीजवळ सांताक्रूझ पूर्व येथे संततधार पावसामुळे पाणी साचले आहे.
#Mumbai: Incessant rain causes waterlogging at Santacruz East near Maratha Colony on Western Express Highway pic.twitter.com/CW0qGf7RBc
— ANI (@ANI) August 4, 2020
कांदिवलीत पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज सकाळी दरड कोसळली आहे. टाईम्स ऑफिसच्या जवळ ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही. दरड कोसळल्यामुळे एका बाजूची वाहतूक ही बंद करण्यात आली आहे. महापालिका आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून दरड हटवण्याचे काम सुरू आहे.
रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावासमुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक धिम्या गतीने सुरू
Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Monday, August 3, 2020
मुंबई उपनगरातील rain updates
४ ऑगस्ट रोजी मुंबईसह इतर उपनगरातील भागात सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांपर्यंत कुलाबा २२०, सांताक्रूझ २५४, राम मंदिर १५२, मीरा रोड १५२, महालक्ष्मी १७२, विद्याविहार १५९ मिमी आणि ठाण्यासह नवीमुंबईतील अनेक ठिकाणी १५० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान येत्या ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता असून ठाणे आणि मुंबईत RED ALERT देण्यात आला आहे.
मुसळधार पावसाने ठाण्यात एकाचा मृत्यू
मुंबईतील जोरदार पावसादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकणी पाणी साचल्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. घोडबंदर रोडवर एका अज्ञात व्यक्तीचा विजेच्या पोलचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ओवळा हनुमान मंदिराजवळ ही घटना घडली आहे. या ठिकाणी रस्त्यावरील विद्युत खांबामध्ये अचानक वीज प्रवाह उतरला होता. खांबाला स्पर्श झाल्यामुळे एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. या व्यक्तीचा मृतदेह हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. कालपासून सलग पाऊस पडल्यानंतर मुंबई व ठाण्यात जोरदार पावसाने सखल भागात पाणी साचले आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच कासारवडवली पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
A person was electrocuted to death near Owala Hanuman temple on Ghodbunder road. Kasarvadavali police official on site: Thane Municipal Corporation (TMC) #Maharashtra
— ANI (@ANI) August 4, 2020
मुंबईत High tide ची शक्यता
High tide of 4.45 metres expected at 1247 hours in #Mumbai today: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) pic.twitter.com/QY5TgfRgWq
— ANI (@ANI) August 4, 2020
समुद्राच्या भरतीमुळे वडाळा आणि परळ येथे पाणी साचल्याने मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर उपनगरी सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच वाशी आणि पनवेल आणि ठाण्यापासून पुढे कल्याण दरम्यान लोकल सेवा चालू आहेत. तर या स्थानकांदरम्यान कोणतीही उपनगरीय गाड्या थांबणार नाहीत. मेल एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक rescheduled केले जात आहे, असे मध्यरेल्वेकडून सांगितले जात आहे.
CR media update about trains pic.twitter.com/ZAaKWURcjW
— Central Railway (@Central_Railway) August 4, 2020
रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मकर येथे ब्लॉक झाला आहे. तर या पावसामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील रस्त्यात दरड कोसळल्याने वाहतूकीस अडचणी निर्माण होत आहे.
Maharashtra: Western Express Highway blocked at Makar, following heavy rainfall overnight pic.twitter.com/h2cuD8Xbpa
— ANI (@ANI) August 4, 2020
सोमवरी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून आज देखील दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुसळधार पाऊस पडत असल्याने सर्व आपत्कालीन सेवा वगळता मुंबईतील सर्व कार्यालये आणि आस्थापने बंद राहतील, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेनेकडून सांगण्यात आले आहे.
Owing to the heavy rainfall since last night and forecasts of extremely heavy rain by @IndiaMetDept, all offices and establishments in Mumbai, except emergency services, will remain closed.#MyBMCUpdates#MyBMCMonsoonUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 4, 2020
आपत्कालीन सेवा वगळता सर्व कार्यालये बंद!
सोमवारी रात्रीपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईसह अनेक सखल भागात पाणी देखील साचण्यास सुरूवात झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) पावसाच्या अतिवृष्टीचा अंदाज पाहता आपत्कालीन सेवा वगळता सर्व कार्यालये व इतर आस्थापने आज बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणीही घराबाहेर पडू नये, असेही सांगण्यात आले आहे.
Mumbai: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) has appealed to all offices and other establishments to remain shut today, except emergency services, in view of heavy rainfall forecast.
— ANI (@ANI) August 4, 2020
मुंबईतील कुर्ला, दादर, सायन, किंग्ज सर्कल याठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तसेच पुढील २४ तासात मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतकर्ता बाळगावी, अशा इशारा पालिकेतर्फे नागरिकांना दिला आहे. गेल्या आठवड्यात काही दिवसांची दडी मारलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा जोरदार आगमन केले आहे.
Mumbai rain updates at 3 am, 4 Aug.
In last 3 hrs Mumbai & around recd very intense rainfall as seen from figure.
Mumbai now on RED ALERT, with possibilities of Extremely Hvy falls at isolated places. Thunder being heard for last 2 hrs & satellite, radar points to intense spells pic.twitter.com/WBziE70wRd— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 3, 2020
मुंबईसह उपनगरात आज (४ ऑगस्ट) आणि परवा (५ ऑगस्ट) रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने समुद्र किनारे आणि किनाऱ्यालगत जाणे नागरिकाने टाळावे. तसेच एखाद्या ठिकाणी पाणी साचल्यास त्या ठिकाणीही जाणे टाळावे, अशा सूचना मुंबई पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे नागरिकांना करण्यात आले आहे.
Latest radar, satellite imges at 1.20 am,4 Aug, indicates very thick clouding ovr west coast including Mumbai. Very hvy rainfall warning already issued.
Intensity of RF over N Konkan, with Mumbai,Thane likely to increase in nxt 48 hrs. Mumbai,Thane watch floods. Pl kp wach.
IMD pic.twitter.com/sgSWodi0Ic— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 3, 2020
पश्चिम रेल्वे ठप्प
सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे अत्यावश्यक सेवेकरता सुरु करण्यात आलेली लोकलसेवा ठप्प झाली आहे. तर याचा फटका हार्बर सेवेला देखील बसला आहे. कारण कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) या दरम्यान संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. तर मध्य रेल्वे उशीराने सुरु आहे.
Western line completely stopped & harbour line stopped between Kurla & Chhatrapati Shivaji Maharaj Terminus (CSMT); central line is running with slow speed: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) #MumbaiRain
— ANI (@ANI) August 4, 2020
बसचे मार्ग वळवले
रात्री पासून कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे बेस्ट बसचे मार्ग देखील बदलण्यात आले आहेत. यामुळे नोकरदार वर्गाला याचा चांगलाच फटका बसणार आहे. विभागीय नियंत्रण कक्ष व इतर सर्व नियंत्रण कक्षांना ‘High Alert’ देण्यात आला आहे.
Maharashtra: Severe waterlogging in various parts of Mumbai following incessant rainfall in the city; visuals from Parel East.
More than 230 mm of rainfall recorded in Mumbai city in the last 10 hours, according to Brihanmumbai Municipal Corporation pic.twitter.com/JVhEWcICvK
— ANI (@ANI) August 4, 2020
- सर्व विभागीय नियंत्रण कक्षांना आवश्यक मनुष्यबळ साधनसामुग्रीसह सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- पर्जन्य जलवाहिन्या विभागाची ६ उदंचन केंद्रे आणि २९९ ठिकाणी बसविण्यात आलेले तात्पुरते पाण्याचा उपसा करणारे संच कार्यान्वित रहातील याची खातरजमा करण्यास सांगण्यात आले असून याकरिता आवश्यक त्या डिझेलची व्यवस्था करण्याचे निर्देश स्थानिक उदंचन संच चालकांना देण्यात आले आहेत.
- अग्निशमन दलास त्यांची पूर बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह आणि साधनसामुग्रीसह ६ प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात ठेवण्यास सांगण्यात आली आहेत.
- राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या ३ तुकड्यांना अणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता तत्पर रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांच्या समन्वय अधिकाऱ्यांना कुलाबा वेधशाळेचा अंदाज सांगण्यात आला असून मदतीकरिता तत्पर रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- बेस्ट (बीईएसटी) (वाहतूक व विद्युत) आणि अदानी एनर्जी यांना सर्व सबस्टेशन ‘High Alert’ वर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच त्यांची मदत पथके तत्पर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
- मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि बॅकअप नियंत्रण कक्ष येथे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व कार्यतप्त्र आहे.
आणीबाणी मदत यंत्रणांपैकी पोलीस, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, बीईएसटी (वाहतूक व विद्युत), शिक्षण खाते, आरोग्य खाते यांच्या समन्वय अधिकाऱ्यांना मुख्य नियंत्रण कक्षात उपस्थित रहाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. - मिठी नदीच्या पातळीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास क्रांतीनगर व इतर परिसरातील नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतराची व्यवस्था करण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्त, एल विभाग यांना देण्यात आल्या आहेत.
- शिक्षण अधिकारी यांना महापालिकेच्या २४ विभागांमधील तात्पुरते निवारे म्हणून निश्चित करण्यात आलेल्या महापालिका शाळा त्वरित मदतीकरिता उघडून ठेवण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाद्वारे देण्यात आले आहेत.
हेही वाचा – व्यायाम करताना मास्क नको