घरमुंबईमुंबईत संततधार; मध्यसह पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबईत संततधार; मध्यसह पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Subscribe

पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशीराने सुरु असल्यामुळे प्रवाशांना पुन्हा एकदा त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

मुंबईसह राज्यात गेल्या काही दिवसांपासून रजेवर गेलेल्या वरुणराजाने गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधत पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले. मुंबई, उपनगर, नवी मुंबई, वसईसह कोकणातील अनेक भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढायला सुरुवात केली आहे. याचा परिणाम रेल्वे वाहतूकीवर झाला आहे. पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशीराने सुरु आहे. त्यामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यमुळे कामाला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे.

आज सकाळपासून पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. सकाळपासूनच महाराष्ट्रासह मुंबईत पावसाने हजेरी लावली असून याचा फटका लोकल सेवेला बसला आहे. पावसामुळे मंगळवारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती आणि पुन्हा एकदा मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – गणेशभक्तांच्या उत्साहावर पाणी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -