घरमुंबईकंगना रनौत : तुमच्या सोयीनुसार समन्सची कार्यवाही होणार का ? - उच्च...

कंगना रनौत : तुमच्या सोयीनुसार समन्सची कार्यवाही होणार का ? – उच्च न्यायालय

Subscribe

उच्च न्यायालयाचे कंगनाला खडे बोल

मुंबई पोलिसांनी तुम्हाला तीनवेळा समन्स बजावले. तरीही तुम्ही पोलिसांसमोर हजर झाला नाही. तुमच्या सोईनुसार समन्सची कार्यवाही होणार का ? असा खडा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने बॉलिवुड अभिनेत्री कंगना रनौतला केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्री कंगना रनौत आणि तिची बहिण रंगोली चंदेल या दोघांना येत्या ८ जानेवारीला पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पण त्याचवेळी मुंबई पोलिसांनी तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नये असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. सोशल मिडिया पोस्टच्या माध्यमातून समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबईच्या वांद्रे पोलिस ठाण्यात कंगनाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

आज या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणात सुनावणी पार पडली. कंगनाने या प्रकरणातला तपास स्थगित करावा अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. पण न्यायालयाने तपास स्थगित करण्याच्या आदेशाला मुंबई हायकोर्टाने मात्र नकार दिला. उच्च न्यायालयाने यापुढील सुनावणी ११ जानेवारी २०२१ रोजी ठेवली आहे. येत्या ८ जानेवारीला दुपारी १२ ते २ दरम्यान वांद्रे पोलिस ठाण्यात राहण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. तर दुसरीकडे पोलिसांनाही अशा प्रकरणात देशद्रोहाचे कलम लावतातच कसे ? असा सवाल केला आहे. तुम्ही पोलिसांना प्रशिक्षण द्यायला हवे. कोणत्या आणि कशा प्रकरणात देशद्रोहाचे कलम लावायचे याविषयी हायकोर्टाने सरकारी वकीलांनाही सूचना केल्या आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -