Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Mumbai Power Cut: मुंबईकरांनो धीर धरा, तासाभरात वीज पुन्हा येतेय, ऊर्जामंत्र्याचे चौकशीचे...

Mumbai Power Cut: मुंबईकरांनो धीर धरा, तासाभरात वीज पुन्हा येतेय, ऊर्जामंत्र्याचे चौकशीचे आदेश

Related Story

- Advertisement -

मुंबईची सोमवारची सकाळ एका अनपेक्षित संकटाने सुरु झाली. मुंबई आणि ठाणे या सर्वात मोठ्या शहरांमधील वीज पुरवठा अचानक खंडीत झाला. लोकांना कामाला जाण्याची घाई, सकाळी उठल्यावर मोबाईल, स्मार्ट वॉच आणि इतर उकरणे चार्ज करण्याची घाई मुंबईकरांना असते. मात्र या अनपेक्षित संकटामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर सर्व स्तरातून टीका सुरु झाली. त्यामुळे ऊर्जा मंत्र्यांना याची दखल घेणे भाग पडले. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून तासाभरात वीज पुन्हा सुरळीत होईल, असे सांगितले.

- Advertisement -

“देखभाल दुरुस्तीचे काम सुरु असताना कळवा-पडघा येथील वीज उपकेंद्रात थोडा बिघाड झाला. त्यामुळे मुंबईतील वीज सेवा खंडीत झाली. मात्र विद्युत विभागातील कर्मचारी युद्ध स्तरावर काम करत असून काही तासातच वीज पुरवठा सुरळीत होईल” – ऊर्जा मंत्री नितीन राऊत

- Advertisement -

 

- Advertisement -