घरमुंबईलंडनच्या धर्तीवर मुंबई आय

लंडनच्या धर्तीवर मुंबई आय

Subscribe

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

ऐतिहासिक वास्तूंसाठी जगप्रसिद्ध असलेल्या इंग्लंडची राजधानी लंडन शहर सुमारे ८०० फूट उंचीवरून पाहायला मिळणार्‍या लंडन आयप्रमाणे मुंबईतही लवकरच ‘मुंबई आय’ सुरु करण्यात येणार आहे. तशी घोषणा बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यासाठी वांद्रे वरळी सिलिंक येथील एक जागा निश्चित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी मुंबईत पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांनी सकारात्मक पवित्रा दर्शविला आहे. तशी माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकल्पामुळे मुंबईतही पर्यटन व्यवसायाल आणखीन चालना मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

अजित पवार म्हणाले की, लंडन येथील लंडन आयने जगभरात प्रसिद्धी मिळवली आहे. त्या अजस्त्र पाळण्यावरून लंडनचे मनोहारी दृश्य बघण्यासाठी लाखो पर्यटक लंडन आयला भेट देतात. मुंबईतही अशा प्रकारचे मुंबई आय असावे, असा प्रस्ताव आपण मांडला होता. त्याला मंत्रिमंडळात सकारात्मक पवित्रा दर्शविण्यात आला आहे. यासाठी वांद्रे-वरळी सिलिंक शेजारील एक जागा निश्चित करण्याचा विचार सुरु आहे. सिलिंकच्या टोल नाक्या शेजारी असणार्‍या जागेत हे ‘मुंबई आय’ निर्माण होऊ शकते. त्याबाबत लवकरच अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वांद्रे रिक्लेमेशेनच्या समोर हे ‘मुंबई आय’ सुरु करण्याचा विचार आहे.

काय आहे लंडन आय
इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये थेम्स नदीच्या काठावर एक उंच पाळणा (जायंट व्हील) आहे. या पाळण्यात बसल्यावर आपला पाळणा सर्वात उंच ठिकाणी गेला की संपूर्ण लंडनचे सुंदर दृश्य दिसते. हे लंडन आय इंग्लंडमधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ मानले जाते. तसेच लंडनमधील सर्वात प्रसिद्ध खुणांपैकी एक मानले जाते. येथे दरवर्षी सुमारे ३५ लाख पर्यटक भेट देतात. १३५ मीटर उंचीचा हा पाळणा ३१ डिसेंबर १९९९ रोजी खुला करण्यात आला. ह्याच्या बांधकामासाठी सुमारे ७ कोटी पाऊंड इतका खर्च आला. लंडन आयमध्ये ३२ अंडाकृती आकाराच्या कुप्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -