मुंबई, नवी मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांचा भारतीय आहारावर भर

मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील ३ ते १८ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये रायन ग्रुप ऑफ इन्स्टीट्युट तर्फे करण्यात आलेल्या ह्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

Mumbai
Mumbai kids eat Indian food for breakfast 1

हल्ली शहरांमध्ये मुलांना सकाळच्या नाश्त्यात पाश्चिमात्य पदार्थ असावेत असाच अट्टाहास असतो. पण मुंबईत मात्र वेगळे चित्र आहे. मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांमध्ये सकाळच्या नाश्त्यात भारतीय पदार्थांना जास्त मागणी असून हळूहळू पाश्चात्य पदार्थ जसे की पास्ता, नुडल्स हे देखील त्यात शिरकाव करत असल्याचे मुंबईतील ८००० हून अधिक विद्यार्थी आणि पालक ह्यांचा केलेल्या सर्वेक्षणात नुकतेच उघड झाले आहे. मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील ३ ते १८ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये रायन ग्रुप ऑफ इन्स्टीट्युट तर्फे करण्यात आलेल्या ह्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

मुलांच्या झोपेवर परिणाम

पाश्चिमात्य पदार्थांचे सकाळच्या नाश्त्यातील प्रमाण हे ६% असून तेच प्रमाण संध्याकाळी २१% पर्यंत गेल्याचे आढळून आले. सर्वेक्षणातील एकूण १८% विद्यार्थी सकाळी आणि १३% विद्यार्थी संध्याकाळी कुठल्याच प्रकारचा नाश्ता करत नसल्याचे देखील समोर आले आहे. ७४% मुले ही आठवड्यातून किमान एकदा तर २६% मुले किमान दोनदा तरी जंक फूड खातात, असे देखील ह्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. ३७% टक्के मुले ही रात्री १० पूर्वी झोपी जातात तर ६३% मुले ही रात्री १० ते १ च्या दरम्यान झोपतात आणि ५८% मुले ही सकाळी ६ ते ७ दरम्यान उठतात. ज्यामुळे बहुतांश जणांची झोप ही अर्धवट होत असल्याचे दिसून येते.

आपल्याला मिळालेलं शरीर हे पोषक आहाराने सांभाळणे ही आपली जबाबदारी आहे. सकाळी नाश्ता न करणे हे पोटाच्या विकाराला आजार देण्यासारखे आहे. आपल्या पाल्यांना वेळेवर भूख लागणे ह्यासाठी त्यांनी मैदानातील खेळ खेळणे, आवश्यक ती झोप घेणे ह्या गोष्टींचे पालन करणे ही पालकांची जबाबदारी आहे.
ग्रेस पिंटो, रायन ग्रुपच्या संचालिका

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here