घरमुंबईआता मुंबईकरांना लोकलमध्ये मिळणार वायफाय!

आता मुंबईकरांना लोकलमध्ये मिळणार वायफाय!

Subscribe

मध्यरेल्वेकडून १६५ लोकलमध्ये 'प्री-लोडेड' वायफाय बसवण्याचा निर्णय

एसटी महामंडळाने खासगी कंपनीशी करार करून एसटींमध्ये ‘प्री-लोडेड’ वायफाय कार्यान्वित केले होते. त्याचप्रमाणे मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये ही ‘प्री-लोडेड’ इंटरनेट सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. लोकलमध्ये प्रवास करताना प्रवाशांना इंटरनेट सुरळीत चालण्यास अनेक अडथळे येतात. जसे ‘घाटकोपर-विक्रोळी दरम्यान इंटरनेटला रेंज नसणे’, ‘ऑनलाइन कार्यक्रम पाहताना पारसिक बोगद्यात ‘बफरचा’ सामना करावा लागणे’ मात्र आता या त्रासापासून सुटका होणार आहे. कारण दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईकरांचे लोकलमध्ये इंटरनेटविना मनोरंजन होणार आहे.

- Advertisement -

हा निर्णय मध्य रेल्वेने घेतला असून ‘कंटेट ऑफ डिमांड’ अंतर्गत लोकलमध्ये वायफाय बसविण्यात येणार आहे. मध्य रेल्वेमधून प्रवास करताना बऱ्याचदा तांत्रिक बिघाडामुळे प्रवासांचा चांगलाच खोळंबा होत असतो. यामुळे कित्येकदा मुंबईकरांच्या मनस्तापास सामोरे जावे लागते. मात्र आता त्याचा प्रवास चांगला व्हावा यासाठी मुंबईकरांना विना इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी मध्य रेल्वेने लोकल डब्यात वायफाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

अशी असेल ‘प्री-लोडेड’ वायफायची सुविधा

‘कंटेट ऑफ डिमांड’ अंतर्गत लोकलमध्ये बसवण्यात येणाऱ्या वायफाय सुविधेमध्ये प्री-लोडेड चित्रपट, मालिका आणि गाणी यांचा समावेश असेल.

- Advertisement -
  • प्रवाशांना केवळ मोबाइल वायफाय सुरू करणे गरजेचे आहे.
  • वायफाय लॉगइन केल्यानंतर प्रवाशांना ‘प्री-लोडेड’ माहिती मोबाइलवर पाहायला मिळेल.
  • यामुळे प्रवाशांच्या इंटरनेट डेटाची देखील बचत होणार आहे.

१६५ लोकलमध्ये वायफाय बसवण्याचा निर्णय मध्यरेल्वेकडून घेण्यात आला असून लोकलमध्ये वायफाय बसविण्याचे काम सुरू आहे. प्री-लोडेड वायफायसाठी मध्य रेल्वेने खासगी कंपनीबरोबर पाच वर्षांचा करार केला आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात या सुविधांचा प्रवाशांना लाभ घेता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -