घरमुंबईलोकल प्रवास करायचाय ना ? मुंबईकरांनो पंधरा दिवस शिस्त पाळाच

लोकल प्रवास करायचाय ना ? मुंबईकरांनो पंधरा दिवस शिस्त पाळाच

Subscribe

मुंबई महापालिकेचे येत्या पंधरवड्याचे निरीक्षण नोंदवणार

मुंबई उपनगरीय लोकल कधी सुरू होणार ? याबाबतची घोषणा राज्य सरकारकडून कधी होणार याची आतुरतेने सर्व मुंबईकर वाट पाहत आहेत. पण मुंबई महापालिकेने मात्र लोकल ट्रेन सुरू होण्यासाठी काही अटी आणि शर्थीच्या आधारावरच लोकल सुरू करण्यासाठी हिरवा कंदील देणार असल्याचे संकेत दिले आहेत. मुंबई महापालिकेकडून दैनंदिन कोरोनाच्या प्रकरणातील वाढ अतिशय बारकाईने अभ्यासली जात आहे. दिवाळीनंतरही आगामी दोन आठवड्यांसाठी ही कोरोनाच्या केसेसमधील वाढ मुंबई महापालिकेकडून अभ्यासली जाणार आहे. या कोरोनाच्या रूग्णांच्या आकडेवारीच्या आधारावरच मुंबई महापालिका लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकते. म्हणूनच येत्या पंधरवड्यात कोरोनाचा आकडा शहरात नियंत्रणात राहण गरजेच आहे.

जर कोरोनाची आकडेवारी वाढली तर मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा सुरू करण्याचा निर्णय आणखी लांबणीवर पडेल. कोरोनाच्या आधी मुंबई लोकलमधून दररोज ७५ लाख प्रवाशांची वाहतूक होत होती. मुंबई उपनगरीय लोकल मार्च महिन्यापासून कोरोनाच्या सावटामुळे बंद आहे. पण गेल्या काही महिन्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलमधून प्रवेश करण्यासाठीची परवानगी देण्यात आली आहे. तर महिलांनाही कमी गर्दीच्या वेळेत प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

- Advertisement -

या कोरोना व्हायरसची १४ दिवसांची सायकल आहे. म्हणूनच हा कालावधी अतिशय महत्वाचा आहे. दिवाळीच्या सणानंतरचा पंधरवड्याचा कालावधी हा अतिशय महत्वाचा असेल. या कालावधीत कोरोनाच्या आकडेवारीत जर वाढ झाली नाही तर राज्य सरकार लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकते अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना दिली आहे. नुकतच ३० ऑक्टोबरला राज्य सरकारने दोन्ही रेल्वेच्या जनरल मॅनेजरला पत्र लिहिले होते. यामध्ये तीन वेळांमध्ये सर्वसामान्य प्रवाशांना प्रवेश देण्याबाबतचा उल्लेख राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावरच राज्य सरकार अंतिम निर्णय घेईल. महिलांसाठी लोकल प्रवासासाठीही प्रत्येक तासाला लोकल प्रवेश देता येईल का यासाठीही राज्य सरकार विचार करत आहे.

कोरोनाच्या बाबतीत २४ ऑक्टोबरपासून कोरोनाच्या संख्येत घट होत गेली आहे. कोरोनाच्या आकडेवारीत प्रत्येक दिवसानिहाय वेगवेगळा ट्रेंड समोर आला आहे. गणपतीसारखाच ट्रेंड हा दिवाळीच्या कालावधीत दिसतो याची चाचपणी मुंबई महापालिकेकडून करण्यात येत आहे. गणपतीच्या कालावधीत जवळपास २ हजारांचा आकडा गाठला होता.

- Advertisement -

राज्य सरकारकडून अजुनही लोकल ट्रेनची सेवा सर्वसामान्यांसाठी वेगवेगळ्या वेळेत सुरू करण्याची चर्चा रेल्वेसोबत झालेली नाही. येत्या दिवसांमध्ये मोबाईल एप्लिकेशनच्या माध्यमातून गर्दी नियंत्रणासाठीचा पर्याय देण्यात येणार आहे. तर येत्या दिवसात ऑटोमॅटिक टिकिट वेंडिंग मशीन उपलब्ध करून देण्याचा पर्यायही सुरू करण्याचा रेल्वेचा विचार आहे. सध्या रेल्वेकडून ८८ टक्के उपनगरीय लोकलच्या फेऱ्या सुरू झालेल्या आहेत. त्यामुळेच लवकरच एटीव्हीएमचा पर्यायही सुरू करण्याचा रेल्वेचा मानस आहे.


 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -