लवकरच लोकल सुरू होणार?

Mumbai
लॉकडाऊन'मुळे २१ दिवसांचा पास वाया; लोकल पासला मिळणार मुदतवाढ?

मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक भागातील स्थलांतरीत कामगारांसाठी गावी जाण्यासाठी संख्येनुसार श्रमिक रेल्वे गाड्यांची उपलब्धता होत नाही. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी मुंबईची लाइफलाइन म्हणजेच लोकल सेवा सुरू करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत नेते केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना विनंती करणार असल्याचं ही समजत आहे.

कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मारकात शनिवारी बैठक झाली. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, शिवसेनेचे खा. संजय राऊत, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टप्प्याटप्प्याने लोकल सुरू करणार…

अधिक काळ मुंबईतील व्यवहार बंद ठेवणे परवडणार नाही. सुरुवातीला अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अधिकारी आणि नंतर टप्याटप्याने मुंबईकरांना उपनगरी लोकल सेवा उपलब्ध करून द्यावी लागेल,  अशी या बैठकीत चर्चा झाली.  येत्या ३१ मे लॉकडाउनचा कालावधी संपुष्टात येत आहे. आता लवकरच राज्य सरकारकडून नव्या सूचना जारी केल्या जाऊ शकतात. सध्याच्या घडीला मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येने २५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.


हे ही वाचा – राज्यात २६०८ नवे रुग्ण


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here