घरमुंबईरात्री १० नंतर आणि सकाळी ७ आधी सर्वांना लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याची...

रात्री १० नंतर आणि सकाळी ७ आधी सर्वांना लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता

Subscribe

मुंबईकरांसाठी लोकल प्रवासासंदर्भात दिलासा देणारी बातमी आहे. रात्री १० नंतर आणि सकाळी ७ आधी सर्वांना लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात राज्य सरकार विचार करत आहे. मात्र, राज्यात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे ८ रुग्ण आढळल्याने आता राज्य सरकार काय निर्णय घएणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकल प्रवासासंदर्भात निर्णय घेऊ शकतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईत कोविड-१९प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत असल्यामुळे लोकल प्रवासाबाबत सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. अधिकारी नॉन-पीक तासांमध्ये सकाळी ७ च्या आधी आणि रात्री १० नंतर प्रवास करण्याची परवानगी देण्याच्या प्रस्तावावर विचार करीत आहेत.

सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि शासनाने ज्यांना पकरवानगी दिली आहे तेच लोकलने प्रवास करत आहेत. महिलांनाही परवानगी आहे, परंतु केवळ नॉन-पीक तासांमध्ये. “आम्ही या आठवड्यात सर्वांसाठी गाड्या पुन्हा सुरू करण्याबाबत आढावा घेऊ, पण त्यासाठी वेळ लागेल. सर्वात मोठी समस्या म्हणजे स्थानकांवर गर्दी व्यवस्थापन यंत्रणेचा अभाव, ज्यामुळे सामाजिक अंतर राखणे खूप कठीण होतं,” असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले की प्रकरणे कमी झाली आहेत, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांसाठी लोकल सुरु करण्यासाठी सकारात्मक दिसत नाही आहेत. मोठ्या प्रमाणातील गर्दीवर सोशल डिस्टन्सिंग राखण्यात रेल्वे असमर्थ आहे. दुसर्‍या अधिका-याने सांगितलं की, सध्याच्या निर्बंधांमुळेही गाड्या फूल झाल्या आहेत आणि तापमानात घट झाल्याने संसर्ग पसरण्याची भीती आहे.

- Advertisement -

“लोकांना सकाळी ७ वाजेच्या आधी आणि रात्री दहाच्या नंतर परवानगी देण्याच्या नवीन प्रस्तावावर चर्चा करत आहोत आणि कार्यालयांना शिफ्ट सिस्टम तयार करण्यासाठी सांगत आहोत. या दोन स्लॉटमध्ये रेस्टॉरंट्स आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये काम करणार्‍यांसारख्या अधिक श्रमिक वर्गाचा समावेश असेल,” असे अधिकाऱ्याने सांगितलं. निर्णय घेताना पॉझिटिव्ह रुग्णांचा दर, मृत्यू दर या गोष्टींचा विचार केला जाईल.

रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय आज होणार

नव्या विषाणूचा मुंबईत शिरकाव झाल्याने रात्रीच्या संचारबंदी वाढवणार की हटवणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. आज संचारबंदी संदर्भात निर्णय होणार आहे. नाताळा आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रात्रीची संचारबंदी करण्यात आली होती. दरम्यान, आज रात्रीच्या संचारबंदीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ही संचारबंदी वाढवणार की हटवणार हे महत्त्वाचं असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -