घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टElection Results Mumbai Live : राहुल शेवाळे विजयी

Election Results Mumbai Live : राहुल शेवाळे विजयी

Subscribe

‘लावा रे ते फटाके’, असे म्हणत शिवसेनेकडून राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.

दक्षिण मध्य मुंबईच्या दोन्ही प्रमुख उमेदवारांनी अर्थात काँग्रेस आघाडीकडून एकनाथ गायकवाड तर भाजप-शिवसेना युतीकडून राहुल शेवाळे हे लढत असून सध्या राहुल शेवाळेंची विजयाच्या दिशेने वाटचाल दिसून येत आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आता उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.

कल्याण लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे.

- Advertisement -

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि दक्षिण मुंबईतील उमेदवार मिलिंद देवरांना मुकेश अंबानींने पाठिंबा देऊन देखील ते पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. त्यांना १ लाख ४८ हजार ९३० मते मिळाली आहेत. तर अरविंद सावंत यांना २ लाख ४ हजार २८० मते मिळाली असून ते आघाडीवर आहेत.

मुंबई उत्तर मतदारसंघात भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी ४७ हजार मतांची आघाडी घेतली आहे. त्यांना तब्बल ६७,६६० मते मिळाली आहेत. तर कांग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांना २०,५४४ मते मिळाली आहेत.

सध्याच्या आकडेवारी नुसार मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपच्या पुनम महाजन आघाडीवर आहेत. त्यांना ४४,४२४ मते मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना २४,०१२ मते मिळाली आहेत. महाजन यांच्याकडे जवळपास २० हजार मतांची आघाडी आहे.

मुंबईच्या सहा मतदारसंघात सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सध्या सर्व मतदारसंघात युतीचे उमेदवार पुढे आहेत. मुंबई उत्तर मधून भाजपचे गोपाळ शेट्टी, मुंबई उत्तर पश्चिमधून मधून शिवसेनेचे गजानन किर्तीकर, उत्तर पूर्वमधून भाजपचे मनोज कोटक, उत्तर मध्यमधून पूनम महाजन, दक्षिण मध्यमधून राहूल शेवाळे आणि दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत सध्या आघाडीवर आहेत. सकाळी १० वाजेपर्यंत तरी आघाडीचे उमेदवार युतीच्या उमेदवारांच्या जवळपासही नाहीत.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -