घरताज्या घडामोडीउत्तर प्रदेशची पारुल चौधरी अर्धमॅरेथॉनमध्ये प्रथम

उत्तर प्रदेशची पारुल चौधरी अर्धमॅरेथॉनमध्ये प्रथम

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली आहे. प्रत्येक वर्षाच्या तिसऱ्या रविवारी या मॅरेथॉन आयोजन केले जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या ड्रीम रनला सुरुवात केली आहे. तर वरळी डेअरीहून अर्धमॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. यंदाच्या मुंबई मॅरेथॉनचे १७ वे पर्व असून एकूण ४ लाख २० हजार यूएस डॉलर बक्षिस आहेत. या मॅरेथॉनसाठी देश-विदेशातील अव्वल धावपटूंसह हौशी स्पर्धकांनीही या स्पर्धेत भाग घेतला आहे. अर्धमॅरेथॉन महिला गटात उत्तर प्रदेशची पारुल चौधरी हिने प्रथम क्रमांकाचं स्थान पटकावलं आहे. तर मुंबई कस्टम्सची आरती पाटीलने दुसरा क्रमांक आणि नाशिकच्या मोनिका आथरेचा तिसरा क्रमांक पटकावला आहे.

गेल्या वर्षी विजेते असलेले केनियाचा कॉसमस लगट आणि इथिओपियाची वर्कनेश अलेमू यांच्या कामगिरीकडे सगळ्याचं लक्ष असणार आहे. या मुंबई मॅरथॉनमध्ये जवळपास ५५ हजार ३२२ धावपटू सहभागी झाले आहेत. ४२ किमीच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये ९ हाजर ६६० धावपटू, २१ किमीच्या हाफ मॅरेथॉनमध्ये १५ हजार २६० तर ड्रीम रनमध्ये १९ हजार ७०७ धावपटू सहभागी झाले आहेत. अर्धमॅरेथॉन पुरुषांच्या गटात तीर्थ पुन यानं पहिला क्रमांक पटकावला आहे. मन सिंग दुसरा तर बिलाम्पाला याने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

- Advertisement -

या स्पर्धेत ४५ हजार डॉलर , २५ हजार डॉलर आणि १७ हजार डॉलर अनुक्रमे मुख्य स्पर्धेतील तीन परदेशी धावपटूंना रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. तर भारतीय स्पर्धकांनी ५ लाख, ४ लाख, ३ लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -