महापौर, उपमहापौर निवडणुकीला ३ महिने मुदतवाढ

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही महानगरपालिकांमधील महापौर तसेच उपमहापौरांचा कालावधी संपणार आहे. मात्र त्यांच्या निवडणुका आता ३ महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Mumbai
The amount of help from the mayor's fund is 15 to 25 thousand rupees
महापौर विश्वनाथ महाडेश्वर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही महानगरपालिकांमधील महापौर तसेच उपमहापौरांचा कालावधी संपणार आहे. मात्र त्यांच्या निवडणुका आता ३ महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, उल्हासनगरसह राज्यातील १३ महानगरपालिकांच्या महापौर-उपमहापौरपदासाठीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मार्च २०१७ मध्ये निवडले गेलेले महापौर तसेच उपमहापौर यांची मुदत या महिनाअखेर संपत असून आता त्यांना ३ महिन्यांचा वाढीव कालावधी मिळाला आहे. राज्यात ऑक्टोबर २०१९ मध्ये विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणूक प्रस्तावित आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकामुळे महापौर निवडणुका पार पाडण्यात अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा महापौरपदाचा कालावधी ८ सप्टेंबर रोजी संपणार होता. मात्र निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे त्यांना ८ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. दरम्यान, या निर्णयासाठी अध्यादेश काढण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

हेही वाचा –

परिक्षेदरम्यान दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

त्या फोटोमागची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here