मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर कोरोना पॉझिटिव्ह

Mumbai Mayor Kishori Pednekar Corona Positive

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची कोणतीच लक्षणं नाही आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी स्वत: ला विलगीकरण करुन घेतलं आहे. याबाबतची माहिती किशोरी पेडणेकर यांनी स्वत: द्विट करुन दिली आहे. संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.

“मी कोविडची अँटीजन चाचणी करून घेतली ती पॉझिटिव्ह आली आहे. कोणतीही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलगीकरण होत आहे माझ्या संपर्कातील सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी. माझ्या घरातील सदस्यांची कोविड चाचणी केली. आपल्या शुभेच्छा व आशीर्वादाने लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन,” असं ट्विट किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.