Saturday, August 8, 2020
Mumbai
29 C
घर ताज्या घडामोडी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मोठ्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मोठ्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मोठ्या भावाचे कोरोनामुळे निधन झाले आहे.

Mumbai
corona
कोरोना विषाणू

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मोठ्या भावाचे कोरोनामुळे निधन झाले आहे. सुनील कदम असे त्यांचे नाव असून गेल्या सात दिवसांपासून सुनील कदम यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे.

दरम्यान, गेल्या एप्रिल महिन्यात महापौर किशोरी पेडणेकर या देखील होम क्वारंटाईन झाल्या होत्या. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होते. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन झाल्या होत्या.

देशात गेल्या २४ तासांत ५७,११७ नवे रूग्ण

देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळाले आहे. गेल्या २४ तासांत पहिल्यांदाच ५७ हजाराहून अधिक नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यासह, ७६४ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. देशात आज संक्रमित झालेल्यांची संख्या १६ लाखांच्या पुढे गेली आहे, तर ३६ हजारांहून अधिकांचा मृत्यूही झाला आहे.

केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्याची संख्या १६ लाख ९५ हजार ९८८ झाली आहे. तर सध्या ५ लाख ६५ हजार १०३ active रूग्ण आहेत. तसेच १० लाख ९४ हजार ३७४ कोरोना रूग्णांनी कोरोनावर मात केली असून रुग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.


हेही वाचा – कोरोनाचा उद्रेक; देशात जुलै महिन्यात ११ लाख रुग्णांची नोंद


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here