घरमुंबईVideo: विनयभंग झाला नाही, 'त्या' महिलेची महाडेश्वरांना 'क्लिन चिट'

Video: विनयभंग झाला नाही, ‘त्या’ महिलेची महाडेश्वरांना ‘क्लिन चिट’

Subscribe

'महापौर विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा हात पिरगळला नाही. त्यांनी माझा विनयभंग केलेलाच नाही, अशा शब्दात सांताक्रूज आंदोलनातील 'त्या' महिलेने आपली भूमिका मांडली आहे.

‘महापौर विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा हात पिरगळला नाही. त्यांनी माझा विनयभंग केलेलाच नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रश्नच येत नाही’, अशा शब्दात सांताक्रूज आंदोलनातील ‘त्या’ महिलेने आपली भूमिका मांडली आहे. महाडेश्वर यांनी एका महिलेचा विनयभंग केला, त्यांनी महिलेचा हात मुरगळला, असा संदेश प्रसारित करणारा व्हिडिओ व्हायरल करण्यामागे एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असून त्यामागे विश्वनाथ महाडेश्वर सरांची बदनामी करणे हा त्यांचा हेतू आहे’, असेही मत या महिलेने व्यक्त केले आहे. यामुळे विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापौर पदाचा राजीनामा द्यावा, ही मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केलेली मागणीच फुसकी ठरली आहे. या संबंधी खुलासा करणारा त्या महिलेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. गेल्या आठवड्यात सांताक्रूज पटेल नगर येथे विजेच्या धक्क्याने माय-लेकाचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांनी रास्ता रोको केला होता. त्यावेळी ‘आम्ही हातांची साखळी करून महापौरांना रस्त्यात रोखले असता महाडेश्वर सरांनी फक्त माझा हात बाजूला केला, त्यांनी माझा हात पिरगळला नाही’, असे त्या महिलेने स्पष्ट केले आहे.

मी कोणाचा विनयभंग केला नाही

मी कोणाचा विनयभंग केला नाही – महापौर

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 6, 2019

- Advertisement -

काय म्हणाली ती महिला

ह्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे माझी आणि महाडेश्वर सरांची विनाकारण बदनामी होत आहे. प्रत्यक्षात माझा विनयभंग झालेलाच नाही. मी महाडेश्वर सरांच्या विरोधात पोलीसांकडे विनयभंगाची तक्रार दाखल करावी, यासाठी राजकीय पक्षांचे पदाधिकारी माझ्याकडे सतत आग्रह धरत आहेत. पण मला राजकारणात अजिबात रस नाही. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, असेही या महिलेने व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.

ऐ दादागिरी नाही करायची मला ओळखत नाहीस तू – महापौर विश्वनाथ महाडेश्वर

दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरलं. सांताक्रूझ मधील अनेक घरांमध्ये पाणी भरलं. त्यामुळे, रविवारी दुपारी तीनच्या दरम्यान एका घरातील माय -लेकाचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला. पण, महापौरांनी त्या दिवशी इथल्या घरांची भेट घेतली नाही. त्यामुळे इथल्या रहिवाशांनी महापौरांचा निषेध व्यक्त केला आणि भेट देण्यासाठी सोमवारी गेलेल्या महापौर आणि स्थानिक नगरसेवक प्रज्ञा राजू भूतकर यांचा स्थानिकांनी निषेध व्यक्त करत ज्या घरी घटना घडली तिथे जाण्यास मज्जाव‌ केला.

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 5, 2019

- Advertisement -

दरम्यान, मी गेली तीन दशकं वांद्रे-खार-सांताक्रूज परिसरात शिवसैनिक म्हणून काम करत आहे. प्रत्यक्ष शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर राजकीय -सामाजिक संस्कार केले आहेत. मी माझ्या आजवरच्या संपूर्ण कारकीर्दीत कधीही महिलांचा अवमान केलेला नाही. माझ्यावर ज्यांनी बिनबुडाचे आरोप केले, त्यांचा खोटेपणा सदर महिलेने स्वत:च उत्तर देऊन उघड केला आहे, असे मत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी व्यक्त केले आहे. माझ्या बदनामीचा कट रचला गेल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे तसेच शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते आणि विभागातील शिवसैनिक तसेच नागरिक हे माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहिले, त्या सर्वांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो, अशा शब्दांत महापौर महाडेश्वर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महापौरांनी महिलांना दमदाटी केली आणि त्यांचा विनयभंग केला असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर काही पक्षांच्या महिला नेत्यांनी विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापौर पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती.

'माझी आणि विश्वनाथ सरांची बदनामी करु नका'- ‘त्या’ महिलेची भूमिका

'माझी आणि विश्वनाथ सरांची बदनामी करु नका'- ‘त्या’ महिलेची भूमिका

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 16, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -