महापालिकेच्या कामगार भरतीमध्ये सावळा गोंधळ

महापालिकेने जाहीर केलेल्या मेरिट लिस्टमध्ये कमी गुण मिळालेल्या उमेदवारांची नावे असून जास्त गुण मिळवलेल्या उमेदवारांची नावेच नाहीत.

Mumbai
BMC
प्रातिनिधिक फोटो

मुंबई महापालिकेच्या चतुर्थ श्रेणी कामगारांच्या भरतीमध्ये सावळा गोंधळ झाल्याची बाब समोर आली आहे. महापालिकेने चतुर्थ श्रेणीतील १३८८ पदांसाठी भरती काढली होती. यासाठी महापालिकेने परिक्षा घेतली होती. या परिक्षेत दीड लाख उमेदवार बसले होते. ही परिक्षा यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली. त्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी या परिक्षेचे निकाल जाहिर करण्यात आले. महापालिकेने या पदांच्या भरतीसाठी मेरिट लिस्ट जाहीर केली आहे. पंरतु, या जाहीर केलेल्या मेरिट लिस्टमध्ये कमी गुण मिळालेल्या उमेदवारांची नावे असून जास्त गुण मिळवलेल्या उमेदवारांची नावे नाहीत. यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी पसरली असून या लिस्टला स्थगिती देण्याची मागणी उमेदवारांकडून केली जात आहे.

हेही वाचा – लष्करात भरती न झाल्याने तरुणाची फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या

दोन हजार विद्यार्थ्यांना ८० टक्यांहून जास्त गुण

पालिकेच्या या परिक्षेत दोन हजार विद्यार्थ्यांना ८० टक्यांहून जास्त गुण मिळाले आहेत. परंतु, मेरिट लिस्टमध्ये या मुलांपेक्षा कमी गुण असणाऱ्या मुलांची नावे असल्याचा आरोप काही उमेदवारांकडून करण्यात येत आहेत. त्याचबरोबर एनसीटीव्हीटी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना या परिक्षेत प्राधान्य दिले गेले आहे. त्यामुळे नाराज उमेदवारांनी पालिका आयआयची कंपनी आहे का असा सवाल केला आहे.


हेही वाचा – पालिकेच्या सुरक्षा रक्षकांची 550 पदांची भरती

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here