Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुंबई पालिकेला दोन आयुक्त हवे - अस्लम शेख

मुंबई पालिकेला दोन आयुक्त हवे – अस्लम शेख

मुंबईची वाढती लोकसंस्था पाहता मुंबईला दोन आयुक्त हवेत असे अस्लम शेख यांनी म्हटले आहे.

Related Story

- Advertisement -

मुंबई पालिकेसाठी २ आयुक्त द्या अशी मागणी मुंबई पालकमंत्री अस्लम शेख यांनी मागणी केली आहे. अस्लम शेख यांनी शहर विकास विभागाकडे ही मागणी केली आहे. मुंबईचा वाढता विस्तार पाहता, मुंबईची वाढती लोकसंस्था पाहता मुंबईला दोन आयुक्त हवेत असे अस्लम शेख यांनी म्हटले आहे. मुंबईत ज्या प्रमाणे सबर्ब आणि सिटीसाठी दोन कलेक्टर आहेत त्याचप्रमाणे दोन आयुक्तही पाहिजेत, असे त्यांनी म्हटले आहे.

एवढ्या मोठ्या शहराचे काम एका आयुक्ताला पाहणे अशक्य होते. ज्याप्रमाणे मुंबईमध्ये दोन कलेक्टर आहेत त्याचप्रमाणे दोन आयुक्त असायला हवेत. मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्र ज्याप्रमाणे विस्तारत आहे त्या गोष्टीचा विचार करून त्याचप्रमाणे मुंबईकरांच्या मुळ समस्या लवकरात लवकर सोडवता येतील यासाठी मुंबईत दोन आयुक्त हवेत, असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे. यासंदर्भात आम्ही यूडी डिपार्टमेंटसोबत मिटिंग केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लवकरात लवकर यासंबंधी निर्णय होऊ शकतो, असेही अस्लम शेख यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून देशातील विविध भागांतून लोक रोजीरोटीच्या शोधात मुंबई शहरात येत असतात. याचा परिणाम म्हणून शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. वाढणाऱ्या लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र सध्या पालिकेसाठी एकच आयुक्त असल्याने नागरिकांचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहतात. शिवाय मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसंदर्भात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पालिका मुख्यालयात यावे लागते. नागरिकांची होणारी ही गैरसोय पाहता मुंबई शहर व उपनगरासाठी दोन महापालिका आयुक्त असणे गरजेचे आहे, अअसे अस्लम शेख यांनी सांगितले.


हेही वाचा – लोकलचा निर्णय मंगळवारपर्यंत घेणार – राज्य सरकार

- Advertisement -

 

 

 

- Advertisement -