घरमुंबईमहापरिनिर्वाण दिनासाठी महापालिकेची जय्यत तयारी!

महापरिनिर्वाण दिनासाठी महापालिकेची जय्यत तयारी!

Subscribe

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी मुंबई महापालिका नागरि सुविधा पुरवणार आहे. यासाठी महापालिकेने २६४ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने बाबासाहेबांचे लाखो अनुयायी मुंबईत येतील. मुंबईत येणाऱ्या या अनुयायांना उत्तोमत्तोम नागरि सुविधा मिळाव्या याची खबरदारी मुंबई महापालिका घेणार आहे. यासंबंधी नुकतेच महापालिका मुख्यालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. महापालिकेचे आयुक्त अजय मेहता या बैठकीचे प्रमुख होते. या बैठकीत विविध विभागांचे प्रमुख, पोलीस प्रशासन, बेस्ट, आपत्ती व्यवस्थापन, मुंबई अग्निशमन दल तसेच इतर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने मुंबईत येणाऱ्या अनुयायांना उत्तम सुविधा मिळावी यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महापालिकेला अनुयायांना कशाप्रकारे सुविधा देता येतील आणि सुरक्षेची जबाबदारी कशी घेण्यात येईल, यावर चर्चा झाली. यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरती शौचालये, चैत्यभूमी येथे दर्शनासाठी उभ्या असणाऱ्या अनुयायांसाठी उन्हापासून संरक्षण छत, पाण्याची व्यवस्था, विद्युत व्यवस्था त्याचबरोबर बसण्याचे बाकडे यासंबंधी चर्चा झाली.

हेही वाचा – बाबासाहेबांचे स्मारक २०२० पर्यंत पूर्ण – मुख्यमंत्री

- Advertisement -

महापालिकेकडून पुरवल्याजाणार ‘या’ सुविधा

मुंबई महापालिकेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६२ व्या महारिनिर्वाण दिनानिमित्ताने १ लाख २५ हजार चौरस फूट मंडपाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ११ रुग्नवाहिकांची सुविधा देण्यात येणार आहे. शिवाजी पार्क, दादर स्थानक, चैत्यभूमी परिसरात माहिती कक्ष उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अनुयायांसाठी ६० क्लोज सर्किट टीव्ही, फिरते कॅमेरे, २ ड्रोन कॅमेरे, २६० स्नानगृह, अतिदक्षका रुग्नवाहिका, पिण्याच्या पाण्याच्या ३८० नळांची व्यवस्था, १६ टॅंकर्स, ४ बोटी आणि ४८ जीवरक्षक, १४ हजार चौ.मी.वर धूळप्रतिबंधक आच्छादक, आपात्कालीन परिस्थितीत १० हजार अनुयायांना महापालिका शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था या व अशा अनेक सेवा महापालिका देणार आहे. त्याचबरोबर या सर्व सुविधा देण्यात याव्या यासाठी महापालिकेकडून २६४ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. हे कर्मचारी चार पाळ्यांमध्ये काम करणार आहेत. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांवर ताण पडू नये म्हणून सफाई कर्मचाऱ्यांची वेळ सहा तास करण्यात आली आहे.


हेही वाचा – आंबेडकर स्मारकाआधी आता चैत्यभूमीवर भीमज्योत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -