Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे कुर्ला येथील कचऱ्याची किंमत ९ कोटी 

कुर्ला येथील कचऱ्याची किंमत ९ कोटी 

कुर्ल्यामध्येच ६०० मे. टन इतका म्हणजे दहा टक्के इतका कचरा दररोज जमा होतो.

Related Story

- Advertisement -

कुर्ला येथे दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची किंमत ९ कोटी रुपये इतकी आहे. ही किंमत पालिकेने ठरवली असून यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. मुंबईत पूर्वी जमा होणारा ९-१० हजार मे. टन कचरा कांजूरमार्ग, देवनार आणि मुलुंड डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात येत होता. आता या तिन्ही डंपिंग ग्राऊंडची क्षमता संपली आहे. त्यामुळे पुढील काळात मुंबईचा कचरा मुंबईबाहेरील डंपिंग ग्राऊंडवर टाकावा लागणार आहे.

पालिकेने गेल्या काही वर्षांत केलेल्या विविध उपाययोजनांमुळे सध्या कचऱ्याचे प्रमाण साडेसहा हजार मे. टनवर आले आहे. त्यापैकी कुर्ल्यामध्ये ६०० मे. टन म्हणजेच दहा टक्के इतका कचरा दररोज जमा होतो, जो वाहनाने देवनार डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात येतो. हा कचरा उचलण्याचे कंत्राट ज्या कंत्राटदाराला दिले होते, त्याची मुदत ३१ डिसेंबर २०२० रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे पालिकेने नवीन कंत्राटदार नियुक्तीसाठी टेंडर काढले, ज्याला ९ कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला. त्यात लघुत्तम देकार म्हणजे पात्र कंत्राटदार मे. ग्रीनव्हिरो इन्फ्राटेक ठरला आहे.

- Advertisement -

यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर होऊन कंत्राटकाम सुरू होण्यास वेळ लागणार असल्याने आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी याच कंत्राटदाराला तात्पुरते म्हणजे ४२ दिवसांसाठी प्रति मे. टन कचरा उचलण्यासाठी १९८ रुपये दराने कंत्राटकाम दिले. दररोज ६०० मे. टन कचरा उचलण्यासाठी १ लाख १८ हजार ८०० रुपये याप्रमाणे ४२ दिवसांसाठी कंत्राटदाराला ४९ लाख ८९ हजार ६०० रुपये देण्यात येणार आहेत. तसेच याच कंत्राटदाराला कुर्ल्यात दररोज निर्माण होणारा ६०० मे. टन कचरा उचलण्यासाठी १ लाख २३ हजार ५५२ रुपये या दराने पुढील २ वर्षांसाठी ९ कोटी १ लाख ९२ हजार ९६० रुपये देण्यात येणार आहेत.

- Advertisement -