घरमुंबईअनधिकृत कार पार्किंगवरील कारवाई आता जोरात

अनधिकृत कार पार्किंगवरील कारवाई आता जोरात

Subscribe

हायड्रोलिक क्रेन वाहनांअभावी अनधिकृत कार पार्किंगवर कारवाई करण्यास अडचणी येत होत्या. परंतु या कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आल्याने आता अनधिकृत पार्किंगवरील कारवाईला गती मिळणार आहे.

मुंबईतील २९ वाहनतळांच्या ५०० मीटर परिसरांसह ५ प्रमुख रस्त्यांवर वाहने उभी करण्यास बंदी करण्यात आल्यामुळे येथील वाहने उचलून नेण्यासाठी टोविंग वाहनांची सेवा भाड्याने देण्यासाठी कंत्राटदाराची अखेर नेमणूक करण्यात आली आहे. या हायड्रोलिक क्रेन वाहनांअभावी अनधिकृत कार पार्किंगवर कारवाई करण्यास अडचणी येत होत्या. परंतु या कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आल्याने आता अनधिकृत पार्किंगवरील कारवाईला गती मिळणार आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांनी बोलावली आमदार, खासदार नगरसेवकांची बैठक; महत्त्वाच्या सूचना देणार

नागरिकांसाठी निर्माण केलेल्या वाहनतळाच्या ५०० मीटर परिसरातील रस्त्यांवर अनधिकृतरित्या उभ्या करण्यात येणार्‍या दुचाकीसह चारचाकी वाहनांवर कारवाईचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहे. त्यानुसार अशाप्रकारे मुंबईतील २९ खुल्या करून दिलेल्या वाहनतळांच्या परिसरात अनधिकृत वाहने उभी केल्यास दहा हजार रुपयांचा दंड आकारला जातो. परंतु ही कारवाई करण्यासाठी वाहने खेचून नेण्यासाठी टोविंग व्हेहीकल तथा क्रेन आणि मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने या कारवाईला काही प्रमाणात खिळ बसली होती. परंतु या कारवाईला गती देण्यासाठी वाहनतळांच्या परिसरातील तसेच पार्किंगमुक्त जाहीर केलेल्या रस्त्यांवरील दुचाकी व चारचाकी वाहनांना खेचून आणण्यासाठी क्रेनची सेवा भाडेतत्वावर घेण्यात येणार आहे. या क्रेनचा वापर महापालिकेच्या २४ विभागांमध्ये केला जाणार असून प्रत्येक हायड्रोलिक क्रेन वाहनांसोबत आवश्यक कामगार पुरवले जाणार आहे.

- Advertisement -

५ वर्षांसाठी सेवा भाडेतत्वावर

पुढील पाच वर्षांकरता ही सेवा भाडेतत्वावर घेण्यात येणार आहे. यासाठी ४२ कोटी ११ लाख रुपयांच्या कंत्राट कामांना स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या ५ वर्षांसाठी प्रशासनाने ५२.०२ कोटी रुपयांची अंदाजित रक्कम निश्चित केली होती. परंतु यासाठी जय मल्हार हायरींग सर्व्हीसेस या कंपनीने २२ टक्के कमी बोली लावत हे काम मिळवले आहे. अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या अधिपत्याखाली या क्रेनचा वापर विभागातील मागणीप्रमाणे केला जाईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

  • दुचाकी वाहने उचलण्यासाठी हायड्रोलिक क्रेन : १२
  • चारचाकी वाहने उचलण्यासाठी हायड्रोलिक क्रेन : २४
  • एमपीओएस मशीन : ३६ नग
  • ५ वर्षांसाठी खर्च करण्यात येणारी रक्कम : ४२ कोटी ११ लाख ४१ हजार रुपये
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -