घरमुंबईड्रग्स प्रकरणी मीरारोडमधून टॉलिवूड अभिनेत्रीला बेड्या

ड्रग्स प्रकरणी मीरारोडमधून टॉलिवूड अभिनेत्रीला बेड्या

Subscribe

तब्बल 'इतक्या' लाखांचे ड्रग्ज करण्यात आले जप्त

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी तपास सुरु असताना समोर आलेले बॉलिवूड ड्रग्स कनेक्शनचे जाळे आता टॉलिवूडपर्यंत पोहचेले आहे. यातच शनिवारी रात्रीच्या सुमारास नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोने मुंबईच्या मीरारोड इथल्या एका हॉटेलवर धाड टाकत एका टॉलिवूड अभिनेत्रीसह लाखोंचे ड्रग्स जप्त केले आहे. ड्रग्स लॉ इन्फोर्समेंट एजन्सीनं एका चांद मोहम्मद नावाच्या ड्रग्स विक्रेत्यालाही यावेळी ताब्यात घेतले. त्याच्याकडून 400 ग्रॅम मेफेड्राइन जप्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी आता एनसीबी संबंधीत हॉटेल मालकासह कर्मचाऱ्यांचीही चौकशी करणार आहे.

 

- Advertisement -

एएनआयनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. एएनआयच्या वृत्तानुसार,ड्रग्स विक्रेता चांद मोहम्मद याला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं. ड्रग्स सप्लायर सईद हा मात्र अजूनही फरार आहे. 8 ते 10 लाख किंमतीचं मेफेड्राइन अर्थात MD कालच्या कारवाईत जप्त करण्यात आलं आहे. एका पोलिस कारवाईमध्येही हे कनेक्शन उघड झालं आहे.

 

- Advertisement -

सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणानंतर नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोने बॉलिवूड ड्रग्स कनेक्शनची पोलखोल सुरु केली आहे. याआधीही एनसीबीने अनेक बॉलिवूड कलाकारांना ड्रग्स प्रकरणी अटक केली, तर अनेक बड्या कलाकारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. अभिनेत्री दिपीका पदुकोण, सारा अली खान, स्कुल प्रीत सिंह, अर्जुल रामपाल यांनी एनसीबीने चौकशीसाठी बोलावले होते. तर अभिनेत्री रिया चक्रवर्ती, भारती सिंह जेलची हवा खाऊन आले.


हेही वाचा –भारतात आता ‘बर्ड फ्ल्यू’ संसर्गाची भीती; केंद्राचा राज्यांना अलर्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -