मोदक, कटलरीसाठी नो प्लास्टिक

राज्य सरकारने प्लास्टिकवर बंदी लागू केली आहे. या बंदीनुसार गेणेशोत्सव मंडळांना मोदक व कटलरीसाठी प्लास्टिक थैल्यांचा वापर करता येणार नाही.

Mumbai
plastic ban
प्लास्टिक बंदी

राज्य सरकारने प्लास्टिकवर बंदी लागू केली आहे. या बंदीनुसार गेणेशोत्सव मंडळांना मोदक व कटलरीसाठी प्लास्टिक थैल्यांचा वापर करता येणार नाही. तसेच डेकोरेशनसाठी थर्माकोलचा वापर करता येणार नाही, असे गणेशोत्सव मंडळांना स्पष्ट करण्यात आल्याचे पालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांनी सांगितले.

राज्य सरकराने २३ जूनपासून प्लास्टिक व अविघटनशील वस्तूंवर बंदी लागू केली आहे. प्लास्टिकविरोधात मुंबईत कारवाई सुरु आहे. गणेशोत्सव जवळ येत आहे. या उत्सवात प्लास्टिक व थर्माकोल वापरता येईल का ? कोणत्या वस्तूंवर बंदी आहे. कोणत्या वस्तू उत्सवादरम्यान वापरता येऊ शकतात याची माहिती पालिकेकडून जाणून घेण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी मार्गदर्शन करण्याची मागणी केली होती. त्यानुसार गुरुवारी पालिका मुख्यालयात गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांना चौधरी यांनी माहिती दिली.

यावेळी कार्यकर्त्यांनी सर्वच प्रकारच्या प्लास्टिक बॅगवर बंदी आहे का, आम्हाला डेकोरेशनसाठी थर्माकोलचा वापर करता येईल का, आम्ही भाविकांना कटलरी आणि मोदक प्लास्टिक पिशव्यांमधून देतो. आता आम्ही कटलरी आणि मोदक प्लास्टिक पिशव्यांमधून देऊ शकतो का असे अनेक प्रश्न यावेळी विचारले. आम्ही त्यांना सर्वच प्रकारच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असल्याचे सांगितले आहे. डेकोरेशन करतानाही थर्माकॉलचा वापर करू नका असे सांगितले आहे. उत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषण करू नका असे आवाहन केले आहे. अनधिकृत मंडप दिसल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल, असेे चौधरी यांनी सांगितले.

गणेशोत्सवादरम्यान प्लास्टिक पिशव्यांचा आणि थर्माकोलचा वापर करू नये, असे आवाहन आम्ही मंडळांना केले आहे. त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. प्लास्टिक बंदीसाठी मंडळांनी तयारी दर्शवली आहे. मखर बनवण्यासाठी थर्माकोलचा वापर करणार नाही, गणेशोत्सवादरम्यान प्लास्टिक बंदीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करू अशी हमी मंडळांनी दिली – निधी चौधरी, पालिका उपायुक्त.