मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; मराठी अभिनेत्रीसहीत, अल्पवयीन मुलीची सुटका

Mumbai
sex racket bust in andheri
अंधेरी येथील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई पोलिसांनी अंधेरी येथील एका हॉटेलवर धाड टाकून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे. या प्रकरणात २९ वर्षीय आरोपी महिलेला अटक तर दोन अभिनेत्री आणि एक अल्पवयीन अभिनेत्रीची सुटका करण्यात आली आहे. सुटका केलेल्यापैकी एक महिला व्यवसायिक गायक आणि तर दुसरी महिला दूरचित्रवाणीवर सुरू असलेल्या सावधान इंडिया या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये अभिनय करत आहे. तर तिसरी महिला मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत असल्याचे उघड झाले आहे. हे रॅकेट उध्वस्त केल्यानंतर चित्रपटसृष्टी आणि सेक्स रॅकेट यांच्या संबंधावर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे.

पोलिसांच्या समाजसेवा शाखेचे पोलीस निरीक्षक संदेश रेवले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली आहे. ज्यावेळी ही धाड टाकली त्यावेळेला तीनही महिलांना (एक अल्पवयीन) बळजबरीने देहविक्री करण्यास भाग पाडले असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर आरोपी महिला प्रिया शर्मा हे सेक्स रॅकेट चालवत असल्याचे रेवले यांनी सांगितले आहे. प्रिया शर्मा या महिलेचा कांदिवली येथे टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. मात्र तरी ती या अनैतिक व्यवसायात गुंतली होती.