जलसा बंगल्याबाहेर सुरक्षेत वाढ

जया बच्चन यांना ऑनलाईन ट्रोल केले जात असल्याने खबरदारीचा उपाय म्हणुन मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.

Jalsa

समाजवादी पार्टीचे खासदार जया बच्चन यांनी संसदेत चित्रपटसृष्टीच्या बचावावर भाष्य केल्याच्या एका दिवसानंतर त्यांच्या जुहू येथील बंगल्या बाहरेच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. सोशल मीडियातील भाषणावरून ट्रोल झाल्यावर कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अमिताभचे आधीपासूनच एक्स-कॅटेगरी सुरक्षा कवच आहे; तथापि, अभिनेत्री आणि राजकारणी-पत्नी जया यांनी चित्रपट सृष्टीतील व्यक्तींवर लावल्या जाणा ड्रग विषयावरून टीका केल्यानंतर ही सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बच्चन निवासस्थानाच्या आसपासच्या गस्तीची संख्या वाढवण्यात आली आहे. दरम्यान सोशल मिडियावरही जया बच्चन यांना ट्रोल केले जात असल्यानेच मुंबई पोलिसांनी सावधानता बाळगत जलसाबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.

बॉलिवूडला ड्रग्जमुळे बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे वक्तव्य आज राज्यसभेत समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी केले होते. तसेच त्यांनी भाजपचे खासदार रवी किशन यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होता. जया बच्चन म्हणाल्या होत्या की, ‘काल लोकसभेत एका खासदाराने बॉलिवूडविषयी निवेदन दिले. ते पण बॉलिवूड इंडस्ट्रीमधूनच आहेत. हे लाजिरवाणे आहे. ज्या ताटात खातात, त्याच ताटात नंतर छेद करता. हे चुकीचे आहे’, असे म्हणत रवी किशन यांच्यावर टीका केली होती.