घरताज्या घडामोडीलाच ऑफर करणाऱ्या तरुणाला मुंबई पोलिसांचा १०० नंबरी रिप्लाय!

लाच ऑफर करणाऱ्या तरुणाला मुंबई पोलिसांचा १०० नंबरी रिप्लाय!

Subscribe

नेहमीप्रमाणे मुंबई पोलिसांनी ट्विटर युजरला दिला भन्नाट रिप्लाय

Whatsappने नवीन वर्षात नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणली आहे. यामुळे सध्या Whatsappची ही नवी पॉलिसी चांगलीच चर्चेत आली आहे. याच पार्श्वभूमीवरून टेस्ला इंक (Tesla Inc) आणि स्पेसएक्स (SpaceX) या दोन बड्या कंपन्यांचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Elon musk) यांनी ट्विट करून सिग्नल Appचा वापर करण्यास सांगितले होते. त्यानंतर एलन मस्क यांच्या ट्विटला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) रोड सेफ्टीच्या पार्श्वभूमीवर गंमतीशी रिप्लाय दिला. मुंबई पोलिसांच्या या ट्विटवर एका तरुणाने चक्क ऑनलाईन लाच दिली आणि त्यालाच मुंबई पोलिसांनी १०० नंबरी रिप्लाय दिला आहे.

तरुणाला मुंबई पोलिसांनी काय दिला रिप्लाय?

एलन मस्क यांनी असे ट्विट केले होते की, ‘सिग्नल वापरा.’ एलन मस्क यांच्यावर ट्विटवर मुंबई पोलिसांनी रिप्लाय केला की, ‘विशेषतः रस्त्यावर असताना.’ याच ट्विटला रिप्लाय करत निखिल प्रजापती नावाच्या एका तरुणाने लाच दिली. निखिलने लिहिले की, ‘हे घ्या १०० रुपये.’ मग यावर मुंबई पोलिसांनी भन्नाट रिप्लाय दिला. ते म्हणाले की, ‘आम्ही #डायल१०० वरील फोन घेणे आणि मुंबईकरांना मदत करणे, याला आम्ही प्राधान्य देतो.’

- Advertisement -


हेही वाचा – मुंबईकर घाबरले! चिकन सोडून भाज्यांवर ताव

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -