घरमुंबईपोलिसांना 'रेस ३'चा आधार, डायलॉग वापरून दाखवला स्वॅग!

पोलिसांना ‘रेस ३’चा आधार, डायलॉग वापरून दाखवला स्वॅग!

Subscribe

मुंबई पोलीस हे मुंबईसाठी नेहमीच अभिमानाचा आणि कौतुकाचा विषय राहिले आहेत. त्यांची साहसी वृत्त त्याचबरोबर लवकरात लवकर गुन्ह्याचा शोध लावण्यात मुंबईचा क्रमांक नेहमीच वरचा राहिला आहे. मुंबई पोलीस नेहमीच चर्चेचा विषय असतात. पण सध्या ते चर्चेत आले आहेत, ते त्यांच्या ट्विटर हँडलवर केलेल्या ट्विटमुळे.

मुंबई पोलिसांची ट्विटची खास शैली

- Advertisement -

मुंबई पोलीस नेहमीच ट्विटर अकाऊंटवरून आपल्या खास शैलीतून, विनोदी वृत्तीतून ट्रॅफिक अपडेट, बचावात्मक कार्याचे आणि जनजागृतीचे ट्विट्स करतात. या विशेष शैलीमुळेच मुंबई पोलिसांचे ट्विटर हँडल खूपच प्रसिद्ध झालं. बऱ्याचदा मुंबई पोलिसांच्या ट्विट्सचे अनेक मीम्सदेखील बनवले जातात. तसेच मुंबई पोलीससुद्धा विविध मिम्सचा वापर करून ट्विटरच्या माध्यमातून लोकांना सुरक्षित राहण्यासाठी सल्ले देत असतात.

ट्विट करण्यासाठी घेतला रेस – ३ च्या डायलॉगचा आधार

- Advertisement -

सध्या अभिनेत्री डेझी शहाच्या तोंडी असलेल्या ‘अवर बिझनेस इज अवर बिझनेस इट्स नन ऑफ युवर बिझनेस’ हा ‘रेस ३’ मधील डायलॉग खूपच ट्रोल होतो आहे. सध्या याचे मीम्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जाताहेत. हाच डायलॉग घेऊन मुंबई पोलिसांनी सुद्धा आपल्या नेहमीच्या अंदाजात ट्विट करत आपली माहिती गोपनीय ठेवण्याचा सल्ला दिला आहे. या ट्विटला तब्बल ४०१६ री-ट्विट तर १०,८१६ लोकांनी लाईक केले आहे. मुंबई पोलिसांच्या या ट्विट ट्रोलिंगच्या अंदाजाला बऱ्याच लोकांकडून पसंती मिळाली, तर काही लोकांना पोलिसांनी अशा तऱ्हेने रेस ३ च्या डायलॉगचा घेतलेला आधार अजिबात आवडलेला नाही, हे ट्विट करून सांगितलं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -