हार्बर मार्गावरील तांत्रिक अडचण दूर, रेल्वे सेवा पूर्वपदावर

लोकल

हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा तासाभरापूर्वी ठप्प झाली होती. पण ती पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे. माहितीनुसार, पहाटे मुंबईच्या हार्बर मार्गावरील लोकल बंद पडली होती. यामुळे पहाटे लोकल ठप्प झाल्यामुळे कामासाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांचे मोठे हाल झाले. पण आता तांत्रिक बिघाडात दुरुस्ती करण्यात आली असून पुन्हा लोकल सेवा सुरळीत सुरू झाली आहे. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी माहिती दिली आहे.

वडाळा इथे रुट पॉइंट मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे, कुर्ला- वडाळा सेक्शन मध्ये काही रेल्वे उभ्या आहेत. तांत्रिक बिघाड ठीक करण्यासाठी यांचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. सीएसएमटी अंधेरी/गोरेगाव मार्गावर रेल्वे सुरू आहेत, अशी माहिती शिवाजी सुतार यांनी ट्विटरवरून दिली.

त्यानंतर ६.४० ला कुर्लाहून सीएसएमटीला जाणारी वाहतूक सुरळीत झाली आहे आणि सीएसएमटीहून कुर्ल्याला जाणारी वाहतूक ही लवकरच सुरू होईल. पण थोड्या वेळानंतर सीएसएमटी ते कुर्ला डाऊन लाईन वाहतुकही सुरळीत झाली असून ७.०५ पासून सर्व ठप्प झालेली वाहतूक पूर्वपदावर आल्याची माहिती शिवाजी सुतार यांनी दिली.