घरमुंबईमुंबईला पावसाने झोडपले; शॉक लागून २ मुलांचा मृत्यू

मुंबईला पावसाने झोडपले; शॉक लागून २ मुलांचा मृत्यू

Subscribe

एकीकडे या पावसामुळे उकाड्याने हैरण झालेल्या मुंबईकरांना दिलासा तर मिळाल मात्र दुसरीकडे पावसामुळे मुंबईकरांचे नुकसान झाले.कांदिवलीत दोन जणांचा मृत्यू

मुंबईमध्ये सोमवारी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार या भागात पाऊस झाला. या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारंबळ उडाली. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, झाड कोसळले, घरं कोसळल्याच्या घटना घडल्या. एकीकडे या पावसामुळे उकाड्याने हैरण झालेल्या मुंबईकरांना दिलासा तर मिळाल मात्र दुसरीकडे पावसामुळे मुंबईकरांचे नुकसान झाले.

कांदिवलीत दोन जणांचा मृत्यू

मुंबईच्या कांदिवलीमध्ये विजेच्या धक्क्याने दोन मुलांचा मृत्यू झाला. कांदिवली पूर्वच्या विमलादेवी चाळीमध्ये ही घटना घडली आहे. तुषार झा (११ वर्ष), रुषभ तिवारी (१० वर्ष) या दोन मुलांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. दोघेही पावसात भिजण्यासाठी घराबाहेर गेले होते. लोखंडी सिडीला स्पर्श होताच त्यांना विजेचा धक्का बसला. त्यांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

- Advertisement -

ठाण्यात झाड कोसळले

ठाण्याच्या खोपट परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे झाड कोसळल्याची घटना घडली आहे. रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या कारवर झाड कोसळले. या घटनेमध्ये कोणी जखमी झाले नाही. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे.

घराची भींत कोसळली

ठाण्याच्या सिध्दार्थनगर भागामध्ये पावसामुळे घराची भींत कोसळली आहे. या दुर्घटनेत जिवितहानी झाली नाही. मात्र घराचे आणि घरातील सर्व सामानाचे मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

वायू चक्रीवादळ सतर्कतेचा इशारा

कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वायू नावाचे चक्रीवादळ तयार होण्याची झाले आहे. वायू चक्रीवादळामुळे हवामानात महत्त्वपूर्ण बदल झाले असून त्यामुळे मुंबईत १५ जूनपर्यंत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या चक्रीवादळामुळे कोकण, गुजरात, मुंबई किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. तसंच मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -