घरताज्या घडामोडी'या'मध्ये मुंबई नंबर १, तर 'महाराष्ट्र' देशात तिसऱ्या नंबरवर

‘या’मध्ये मुंबई नंबर १, तर ‘महाराष्ट्र’ देशात तिसऱ्या नंबरवर

Subscribe

देशभरात आर्थिक गुन्ह्यांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे.

संघटित गुन्हेगारी जवळपास संपल्यात जमा झाली असताना देशभरात आर्थिक गुन्ह्यांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर येत आहे. एखाद्या व्यक्तीशी गोड बोलून त्या व्यक्तीचा विश्वासघात करणे. एखाद्या व्यक्तीला नोकरीला लावतो सांगत चुना लावणे. अशा एक ना अनेक घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, संपूर्ण देशात आर्थिक गुन्हे सर्रास घडू लागले असून त्यात महाराष्ट्र राज्य तिसऱ्या तर मुंबई शहर टॉपवर असल्याचे ‘राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो’च्या वर्ष २०१८ मधील आकडेवारीतून समोर आले आहे.

आर्थिक घोटाळे वाढले

आर्थिक घोटाळे किंवा फसवणुकीच्या माध्यमातून आर्थिक गुन्हे घडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. हे गुन्हे करण्यासाठी गँगवॉर घडवावा लागत नाही. तसेच कोणत्याही व्यक्तीचा रक्तपात देखील करावा लागत नाही. केवळ डोकं शांत ठेवून आणि संयमाने आर्थिक गुन्हे केले जातात. कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांची संख्या वाढत असून ही चिंताजनक बाब आहे. शिवाय बऱ्याच जणांची लाखो रुपयांची आर्थिक लुबाडणूक होत आहे. अशा गुन्ह्यांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. तसेच या गुन्ह्यांमध्ये नागरिक देखील सहज फसत आहेत. आर्थिक गुन्ह्यांचा आलेख देशभरात वाढत असून काही छोटी राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये या गुन्ह्यांचे प्रमाण फारसे नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

- Advertisement -

गुन्ह्यांची आकडेवारी

शहरे – २०१६ – २०१७ – २०१८
मुंबई – ४१९१ – ४४६२ – ४८०३
दिल्ली – ५९४२ – ४८०२ – ४४६९
जयपूर – ४७४२ – ४३१८ – ४३८५
कोलकाता – २१५५ – २१९८ – २७२९
लखनौ – १५८४ – १८८६ – २५०४

महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

राज्य – २०१६ – २०१७ – २०१८
उत्तर प्रदेश – १५७६५ – २०७१७ – २२८२२
राजस्थान – २३५८९ – २१६४५ – २१३०९
महाराष्ट्र – १३००८ – १३९४१ – १४८५४

- Advertisement -

हेही वाचा – PMC Bank प्रमाणे सिटी को-ऑप बँकेच्या संचालकांना अटक करा; मातोश्रीबाहेर बॅनर


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -