देशापाठोपाठ मुंबईतील सोसायट्यांनीही स्वत:ला केले ‘लॉकडाऊन’

मुंबईतील काही सोसायट्यांनी आता स्वत:ला लॉकडाऊन केले आहे.

Mumbai
mumbai societies took important decision after lockdown because of coronavirus
देशापाठोपाठ मुंबईतील सोसायट्यांनीही स्वत:ला केले 'लॉकडाऊन'

करोनाने संपूर्ण जगभर थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस राज्यात देखील करोनाबाधितांची संख्या वाढत असताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ मार्च पर्यंतचा लॉकडाऊन केला होता. या लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहिर केला आहे. दरम्यान, आता देशापाठोपाठ मुंबईतील काही सोसायट्यांनी देखील स्वत:ला लॉकडाऊन करुन घेतले आहे. मुंबईतील काही सोसायट्यांनी महत्त्वाचे असे निर्णय घेतले आहेत.

सोसायट्यांनी घेतले महत्वाचे निर्णय

 • मुंबई उपनगरातील सोसायटीतील रहिवाशांना गेटबाहेर सोडण्यास सक्त मनाई केली आहे.
 • तातडीच्या, टाळता न येणार्‍या कामासाठीच लोकांना बाहेर सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 • तसेच मुलांना सोसायटीच्या आवारात खेळण्यास मज्जाव केला आहे. मुलांना घरीच थांबवण्याची विनंती पालकांना केली आहे.
 • घरकाम, स्वयंपाक आणि इतर काम करण्यासाठी येणाऱ्या मदतनीस व्यक्तीला देखील सध्या सोसायटीत येण्यास मनाई केली आहे.
 • उपनगर जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षाचे सर्व गृहनिर्माण संस्थांना आदेश देण्यात आले आहेत.
 • या सर्वावर सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी देखरेख ठेवायची, अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे.
 • सोसायटीमध्ये या नियमांचे पालन अगदी काटेकोरपणे होत आहे.
 • सोसायटीतील रहिवाशांना लागणारा किराणा आणि भाजीपाला याची यादी करून दुकानातून ते मागवून घ्यायचे आणि गेटवर गर्दी न करता त्याचे वाटप करायचे आहे. तसेच अत्यावश्यक सेवेत येणारे दूध याचे वाटपही घरोघरी न होता आता गेटजवळच करण्यात येत आहे.
 • बाहेरून येणाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदीच घालण्यात आली आहे. तसंच काहीस तातडीचं काम असेल तर गेट बाहेर त्या व्यक्तीशी संपर्क साधायचा अन्यथा गेटवर हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर ठेवायचे.

  हेही वाचा – …आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यालाही मिळाला पोलिसांचा प्रसाद


प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here