पालघरमध्ये पबजीच्या वेडापायी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Palghar
uttar pardesh the woman audio went viral after the suicide said i am corona positive
CoronaVirus: कोरोना पॉझिटिव्ह असल्याने महिलेची आत्महत्या! ऑडिओ व्हायरल

पबजी गेमचे अनेक तरुणांचा वेड लावले असून काही मृत्यू देखील या गेमच्या वेडापायी झाले आहेत. आता आणखी एक तरुण या गेमचा बळी पडला असल्याचे समोर आले आहे. नुकतेच पबजीच्या वेडापायी डहाणूतील एका आदिवासी विद्यार्थ्याने पबजी खेळण्यापासून रोखले म्हणून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हेमंत झाटे (वय १९) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. पबजी खेळण्यापासून रोखले म्हणून त्याने गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले आहे.

हेमंत हा डहाणूमध्ये राहत असून बारावी उत्तीर्ण झाला होता. सध्या तो कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याचे वडील चिराग मेहता यांच्या भातगिरणीमध्ये काम करत होते. घरातील आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे हेमंतचे शिक्षण थांबले होते. मात्र, मेहता यांनी हेमंतच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी घेतली होती. मेहता यांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंतला पबजी गेमचे व्यसन लागले होते. रात्री उशिरापर्यंत तो मोबाइलवर पबजी खेळत असे. मेहता यांनी हेमंतला अभ्यासावर लक्ष केंद्रीत कर. पबजी खेळू नको, असे अनेकदा सांगितले. सोमवारी तब्येत बरी नाही, असे सांगून हेमंत त्याच्या खोलीमध्ये लवकर झोपण्यासाठी गेला. मात्र, त्याने खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्याजवळ कोणतीही चिठ्ठी सापडली नाही. त्यामुळे अद्याप त्याने आत्महत्या का केली याचा सुगावा लागला नाही.

हेही वाचा –

भाजपच्या काळात महाराष्ट्राची आर्थिक प्रगती खुंटली – डॉ. मनमोहन सिंह