मुंबईत अतिरिक्त वीज आणण्याचा मार्ग मोकळा 

Mumbai
mumbai power transmission network

मुंबईत आता अतिरिक्त वीज वाढवून आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बहुप्रतिक्षित विक्रोळी सबस्टेशनचे काम अखेर मार्गी लागले आहे. अनेक वर्षे हा विषयरखडल्याने मुंबईत अतिरिक्त वीज आणण्यासाठी मर्यादा होत्या. पण आता अदाणी ट्रान्समिशन लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी यांच्यात झालेल्या करारानुसार आता ही अतिरिक्त वीज आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खारघर विक्रोळी ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत हा संपुर्ण प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

गेल्या अनेक वर्षांमध्ये टाटा पॉवरने विक्रोळी सबस्टेशनचे घोंगडेभिजत कायम ठेवले होते. त्यामुळे मुंबईत अतिरिक्त वीज वाहून येण्यासाठीचाप्रश्न सुटत नव्हता. जवळपास ८ वर्षे हा प्रकल्प रखडल्यानंतर राज्य वीज नियामक आयोगाने या विषयावर टॅरिफ बेस कॉम्पिटीटीव्ह बिडिंगची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठीच एका समितीची नेमणुकही करण्यात आली.अदाणी ट्रान्समिशन लिमिटेड (एटीएल) ला वीजदरांवर आधारीत स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेतूनहे काम करण्यासाठीची परवानगी मिळालेली आहे. एकुण ३४ किलोमीटर अंतराचेहे वीज पारेषण वाहिनीचे नेटवर्क आहे. त्यामध्ये ४०० केव्हीजीआयएस क्षमतेचे सबस्टेशन हे विक्रोळी येथे उभे राहणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईत अतिरिक्त वीज आणण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. बिल्ड, ओन, मेंटेन या बीओटी तत्वावर हे काम एटीएलला देण्यात आले आहे. या प्रकल्पाचा कालावधी हा ३५ वर्षे इतका असणार आहे. या पारेषणप्रकल्पाअंतर्गत ४०० केव्ही आणि २२० केव्हीक्षमतेच्या वाहिन्या उभारल्या जातील. खारघर विक्रोळी ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेडमुळेएटीएलची वीज पारेषण क्षमता वाढणार आहे. तसेच येत्या २०२२ पर्यंत २० हजार सर्कीटकिलोमीटरचे वीज पारेषण वाहिन्यांचे जाळे विकसित करण्यात करण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले असल्याची प्रतिक्रिया अदाणीट्रान्समिशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिक सरदाना यांनी दिली.