मुंबई विद्यापीठाकडून आयडॉलचे वेळापत्रक जाहीर

बीएससी आयटी, टीवायबीएससी, एमएससी पार्ट २ च्या आयटी आणि सीएस या अभ्यासक्रमांच्या नियमित आणि बॅकलॉग परीक्षांचे वेळापत्रक आयडॉलकडून संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

तांत्रिक समस्या निर्माण झाल्यामुळे दूर व मुक्त शिक्षण अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) अंतिम वर्षाच्या परीक्षा १९ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानुसार बीएससी आयटी, टीवायबीएससी, एमएससी पार्ट २ च्या आयटी आणि सीएस या अभ्यासक्रमांच्या नियमित आणि बॅकलॉग परीक्षांचे वेळापत्रक आयडॉलकडून संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षा १९ ते २२ ऑक्टोबरदरम्यान होणार आहेत.

आयडॉलकडून ३ आणि ५ ऑक्टोबरला असलेल्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना वेळेवर लॉगिन आयडी, पासवर्ड व परीक्षेच्या लिंक मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक ताण सहन करावा लागला होता. परीक्षा सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याने तांत्रिक समस्या निर्माण झाल्या विद्यापीठाकडून सांगण्यात आले. या परीक्षा १९ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानुसार आता बीएससी आयटी, टीवायबीएससी, एमएससी पार्ट २ च्या आयटी आणि सीएस या अभ्यासक्रमांच्या नियमित आणि बॅकलॉग परीक्षांचे वेळापत्रक आयडॉलकडून जाहीर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बीए, बीकॉम, बीएससी आयटी आणि एमसीएच्या बॅकलॉग परीक्षांचे वेळापत्रकही आयडॉलकडून संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षा १९ ते २२ ऑक्टोबरदरम्यान होणार आहेत. मुंबई विद्यापीठाच्या https://old.mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळावर परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.