घरमुंबईविज्ञान आणि अभियांत्रिकीचे ४ निकाल जाहीर

विज्ञान आणि अभियांत्रिकीचे ४ निकाल जाहीर

Subscribe

मुंबई विद्यापीठाच्या विज्ञान आणि अभियांत्रिकीचे ४ निकाल जाहीर झाले आहेत.

मुंबई विद्यापीठाने काल रात्री नोव्हेंबर / डिसेंबर२०१८ मध्ये घेतलेल्या तृतीय वर्ष बीएससी संगणकशास्त्र आणि ह्युमन सायन्स सत्र ५ हे विज्ञानशाखेचे २, बीई संगणक अभियांत्रिकी आणि बीईस्थापत्य अभियांत्रिकी  सत्र ७ या अभियांत्रिकी शाखेचे २ असे एकूण चार परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. आजपर्यंत १७२ परीक्षेचे निकाल विद्यापीठाने जाहीर केलेले आहेत.

५४,४३० उत्तरपत्रिका आणि १,४७६ शिक्षक

उत्तरपत्रिका १ हजार ४७६ शिक्षकांनी तपासल्या आहेत. यातील १२ हजार ९७२ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन करण्यात आले. यातील तृतीय वर्ष बीएससी संगणकशास्त्र सत्र ५ च्या परीक्षेत ३३८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर ३३७८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यातील २३५६ विद्यार्थी परीक्षेत  उत्तीर्ण झाले आहेत. या निकालाची टक्केवारी ७१.९६ % एवढी आहे. बीई संगणक अभियांत्रिकी सत्र ७ च्या  परीक्षेत ५५७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर, ५५१७ विद्यार्थीपरीक्षेस बसले होते. यातील ५१२३ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत ३६१ विद्यार्थीअनुत्तीर्ण झाले आहेत. या निकालाची टक्केवारी ९३.४२ % एवढी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -