आता ‘या’ही स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या होणार अतिरिक्त परीक्षा

मुंबई विद्यापीठ तसेच सलंग्नित महाविद्यालयातील क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धा, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसीच्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या आणि प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाने मोठा दिलासा दिला आहे.

Mumbai
Mumbai University thane sub center will expand
मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठ तसेच सलंग्नित महाविद्यालयातील क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धा, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसीच्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या आणि प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाने मोठा दिलासा दिला आहे. या अशा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची अतिरिक्त परीक्षा घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई विद्यापीठाने आजच्या विद्या परिषदेत घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने विद्यापीठाने सर्वसमावेशक अशी योजना तयार केली आहे. याबाबतची माहिती मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव (जनसंपर्क) डॉ. लीलाधर बन्सोड यांनी एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.

मुंबई विद्यापीठ तसेच सलंग्नित महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी हे महाविद्यालयीन, विद्यापीठ, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध खेळाच्या स्पर्धामध्ये, तसेच सांस्कृतिक स्पर्धा, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त परेडमध्ये सहभागी होणारे विद्यार्थी, नेशनल इंटिग्रेशन कॅम्प, आव्हान, इंटरनेशनल युथ एक्सेंज प्रोग्राम अशा स्पर्धांमध्ये सहभागी होत असल्याने, तसेच प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर अशा विद्यार्थ्यांना परीक्षांपासून मुकावे लागत असे, त्यामुळे अशा सर्व विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी म्हणून मुंबई विद्यापीठाने या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त परीक्षा घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विशेष बाब म्हणजे विद्यापीठ अथवा महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करतांना परीक्षांना मुकाव्या लागणाऱ्या विद्यार्थ्यांकडून या अतिरिक्त परीक्षेला बसताना परीक्षा शुल्क आकारले जाणार नसल्याचेही आजच्या विद्या परिषदेत ठरविण्यात आले.

मुंबई विद्यापीठ आणि सलंग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी हे विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन महाविद्यालये आणि विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत असतात, अनेक विद्यार्थी त्यांच्या कलागुणांच्या जोरावर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरी करुन महाविद्यालये आणि विद्यापीठाचे नावलौकीक करीत असतात, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची काळजी घेणे आपली जबाबदारी असे समजून अतिरिक्त परीक्षा घेण्याचा निर्णय आजच्या विद्या परिषदेत आम्ही घेतला आहे.
– प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

या निर्णयाच्या अनुषंगाने महाविद्यालयीन स्तरावरील सत्र एक ते चार तसेच पाचव्या आणि सहाव्या सत्रातील अप्लाईड कंपोनेंट मधील विषयांच्या परीक्षा या महाविद्यालयात आयोजित केल्या जाणार तर, कोअर कंपोनेंटमधील विषयांच्या परीक्षा या विद्यापीठातर्फे आयोजित केल्या जाणार आहेत. नियोजित परीक्षा संपल्यानंतर तीस दिवसाच्या आत या परीक्षांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही विद्या परिषदेत ठरविण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here