योगेश सोमण यांच्या बाबतीत जे घडतेय ही असहिष्णुता नाही का?

अभिनेते योगेश सोमण यांच्या बाबतीत जे घडतेय ही असहिष्णुता नाही का?, असा सवाल भाजप नेते, माजी शिक्षणमंत्री आमदार अँड. आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

Mumbai
SSC students will get internal marks
आशिष शेलार

‘गेल्या महिनाभरापासून मुंबई विद्यापीठात अभिनेते योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या गोष्टी आता असहिष्णुतेत बसत नाहीत का?’, असा सवाल भाजप नेते, माजी शिक्षणमंत्री आमदार अँड. आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

माजी शिक्षणमंत्री आमदार अँड. आशिष शेलार यांचा सवाल

मुंबई विद्यापीठाच्या अँकडमी आँफ थिएटर आर्टचे संचालक यांनी स्वा. सावरकर यांच्याबाबत गौरव उद्गार काढले आणि त्यांच्याबाबत करण्यात आलेली विधाने खोडली म्हणून त्यांच्या विरोधात विद्यार्थ्यांना हाताशी धरून काही असंतुष्ट आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या तथाकथित विद्यार्थ्यांची चळवळ चालवणाऱ्या नेत्यांनी वाद निर्माण केला आहे. काँग्रेस आणि डाव्या विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी योगेश सोमण यांना धमकावल्याची माहिती ही मिळते आहे? ही असहिष्णुता नाही का? असा सवाल उपस्थित केला आहे.

विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर घेऊन जाण्याचे प्रकार

गेल्या काही दिवसांपासून देशात विद्यार्थ्यांना हाताशी धरून समाजात आणि शैक्षणिक संस्थेत असंतोष माजवून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर घेऊन जाण्याचे प्रकार होत आहेत. स्वातंत्रवीर सावरकर यांच्या विषयी आक्षेपार्ह विधाने सोयीस्करपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजाने खपवून घ्यावी का? जर मुंबई विद्यापीठातील थिएटर अकॅडमीचे संचालक योगेश सोमण यांनी त्याबाबतीत परखड उत्तरे दिली म्हणून काँग्रेसच्या विद्यार्थी दलाचे नेते मुंबई विद्यापीठाला वेठीस धरून यांच्या विरोधात आंदोलन करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतात. पोलिसांकडे जाऊन सोमण यांच्या विरोधात गांधी कुटुंबाचा घोर अपमान झाला म्हणून तक्रार करतात मग ही काँग्रेसची असहिष्णुता नाही का?

मंगळवारी, थिएटर आर्टच्या शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवला जात नाही, असे मुद्दे काढून अकादमीच्या ठराविक विचारधारा असलेल्या मुलांना हाताशी धरून पुन्हा एकदा योगेश सोमण यांच्या विरोधात काही राजकीय व्यक्तीने मुंबई विद्यापीठात गोंधळ घातला. सोमण यांना सक्ती ने राजीनामा घेण्यात यावा यासाठी दबाव टाकला. विद्यापीठाने दबावाला बळी पडून सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवले ही असहिष्णुता नाही का?

त्यामुळे योगेश सोमण यांच्यावर झालेल्या अन्यायावर मुंबई विद्यापीठाने समिती नेमून थिएटर अकादमीची गेल्या पाच वर्षाची सखोल चौकशी व्हावी. म्हणजे सत्य काय आहे ते विद्यार्थ्यांना कळेल. तसेच स्वत:चे राजकीय बस्तान बसावे आणि त्यासाठी अभिव्यक्तीच्या नावाने बेताल व्यक्तव्य करावे आणि त्याला प्रतिउत्तर आल्यावर हेच लोक आंदोलन करणार ही असहिष्णुता नाही का? असा सवाल आमदार अँड. आशिष शेलार यांनी केला आहे.


हेही वाचा – वाडिया रुग्णालयाचे भवितव्य ठरणार; मुख्यमंत्री घेणार महत्त्वपूर्ण बैठक


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here