मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राचे होणार विस्तारीकरण

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या योजनेकरता ठाणे महानगर पालिकेकडून २० कोटीचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये नविन अभ्यासक्रम, पायाभूत सुविधा आणि वसतिगृहाची सुविधा यांचा समावेश असणार आहे.

Mumbai
Mumbai University thane sub center will expand
मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राचे लवकरच विस्तारीकरण होणार आहे. यासाठी ठाणे महानगर पालिकेने २० कोटीचा निधी मंजूर केला आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुहास पेडणेकर यांच्या प्रयत्नातून आणि आमदार निरंजन डावखरे यांच्यां सहकार्यातून मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रासाठी प्रथमच २० कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.


वाचा – मुंबई विद्यापीठाला २५ हजारांचा दंड


या सुविधा होणार उपलब्ध

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राच्या विस्तारीकरणाच्या या योजनेत पायाभूत सुविधा, नविन वसतिगृह आणि नविन अभ्यासक्रमांचा समावेश आहे. त्याचबरोबर ठाणे महानगर पालिका उभारत असलेल्या नविन स्टार्ट-अप केंद्रामध्ये मुंबई विद्यापीठाला ३० हजार स्केअरफूट जागा उपलब्ध करुन दिली जाणार असून ज्यामध्ये इन्क्युबेशन, एक्सलेरेशन आणि स्टार्टअपच्या उपक्रमाना अधिक गती मिळणार आहे. आज मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर सुहास पेडणेकर यांनी ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. यावेळी आमदार निरंजन डावखरे, व्यवस्थापन परिषद सदस्य दिपक मुकादम, प्राचार्य डॉ. नरेशचंद्र, वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय भामरे, अधिसभा सदस्य महादेव जगताप, शशिकांत झोरे, ठाणे उपकेंद्रांचे संचालक डॉ. चंद्रशेखर मराठे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.


वाचा – मुंबई विद्यापीठ उघडणार विज्ञान- तंत्रज्ञान क्षेत्रातील नवे दालन


पालिकेची बस सुविधा थेट उपकेंद्रापर्यंत

या बैठकीतील सकारात्मक चर्चेच्या अनुषंगाने, ठाणे परीक्षेत्राला लावण्यात आलेला मालमत्ता कर हा व्यावसायिक संकुलाच्या दराप्रमाणे लावण्यात आला आहे. तो दर शिक्षण संकुलाच्या दराप्रमाणे लावण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. तसेच पाणी शुल्कातही मोठी सवलत दिली जाणार असल्याचे आजच्या बैठकीत सांगण्यात आले. त्याचबरोबर पालिकेच्या मदतीतून ठाणे उपकेंद्रात मेगा प्लांटेशन करण्यात येणार असून दिशादर्शक फलकही लावण्यात येणार आहेत. यासोबतच महानगर पालिकेची बस सुविधा थेट उपकेंद्रापर्यंत देण्यात येणार असल्याचे आजच्या सभेत सकारात्मकरित्या चर्चा करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे नागरिकांच्या सुविधेसाठी आणि माहितीसाठी ठाणे महानगर पालिकेच्या संकेतस्थळावर ठाणे उपकेंद्रासाठी स्वतंत्र लिंक ही लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.


वाचा – मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचे पितळ उघड!


या उपकेंद्रात हे अभ्याक्रम शिकवले जातात

आजमितीस मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रात एक इमारत असून, बीएमएस-एमबीए आणि बीबीए-एलएलबी हे दोन एकात्मिक पाच वर्षीय अभ्यासक्रम शिकविले जात आहेत. ठाणे महानगर पालिकेने मंजूर केलेल्या २० कोटीच्या निधीतून ठाणे उपकेंद्राच्या विस्तारीकरणाला मोठी मदत होणार असून वसतिगृह, अद्ययावत पायाभूत सुविधांबरोबरच नव-नविन अभ्यासक्रम सुरू करण्यास मोठा हातभार लागणार आहे.   – सुहास पेडणेकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here