मुंबई विद्यापीठ उघडणार विज्ञान- तंत्रज्ञान क्षेत्रातील नवे दालन

मुंबई विद्यापीठाने हॅरिसबर्ग युनिव्हर्सिटीजशी करार केल्यामुळे वरील विषयांमध्ये पदवी, पदव्युत्तर आणि पीचएचडी अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे.

Mumbai
mumbai univercity
मुंबई विद्यापीठ

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना मुंबई विद्यापीठाकडून एक नवी संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठ आणि अमेरिकेतील हॅरिसबर्ग युनिव्हर्सिटीज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्यात सामंजस्य करार झाला असून आता याचा फायदा भारतीय विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यामुळे डेटा सायन्स, आर्टिफिशिअल इंटेलिजंस, कॉम्प्युटर सायन्स, अॅनलेटिक्स, बायोटेक्नॉलाजी आणि जनरल सायन्स क्षेत्रातील अद्ययावत ज्ञानाचे कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केले जाणार आहेत.

करारान्वये असणार कोर्सेस

मुंबई विद्यापीठाने हॅरिसबर्ग युनिव्हर्सिटीजशी करार केल्यामुळे वरील विषयांमध्ये पदवी, पदव्युत्तर आणि पीचएचडी अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. यांतर्गत स्टुडंट एक्सचेंज, फॅकल्टी ट्रान्सफर असे उपक्रमही हाती घेतले जणार आहे. शिवाय मुंबई विद्यापीठात सुरु असलेल्या इक्युबेशन सेंटरसाठीही या करारान्वये नविन उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील,असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.

कुलगुरुंच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रोफेसर रविंद्र कुलकर्णी, कुलसचिव प्रोफेसर सुनिल भिरूड, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय भामरे यांच्यासह पेन्सिलव्हॅनिया स्टेटच्या राजदूत कनिका चौधरी, हॅरिसबर्ग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजीचे वरीष्ठ विश्वस्त गव्हर्नर मार्क सिंगेल, मुख्य कार्यकारी अधिकारी पॅसिफिक सिंथिआ ट्रॅएगर, हरिसबर्ग युनिव्हर्सिटीचे वरिष्ठ व्यवस्थापक डग फायरस्टोन आणि फॉरेन्सिक सायन्सचे संचालक रॉबर्ट फ्युरे हे उपस्थित होते.


“विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्ययावत माहिती आणि विशेष ज्ञानाचे आदानप्रदान करुन विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक व व्यावसायिक गुणवत्ता वाढवून, विकासाला प्राध्यान्य देण्यासाठी तसेच बदलत्या काळाच्या गरजांना अनुसरुन विद्यार्थ्यांमध्ये नवे माहितीचे दालन खुले करण्यासाठी विद्यापीठाच्या दृष्टिकोनातून हा महत्वपूर्ण करार आहे.” 

-प्रोफेसर सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here