घरमुंबईमुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे तीन अभ्यासक्रम बंद

मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे तीन अभ्यासक्रम बंद

Subscribe

मुंबई विद्यापीठातील वादाची मालिका संपण्याचे नाव घेत नाही. विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाने तीन अभ्यासक्रम तडकाफडकी बंद केल्याने आता नवीन वाद निर्माण झाला आहे.

अ‍ॅट्रोसिटीच्या मुद्द्यावरुन चर्चेत आलेले मुंबई विद्यापीठाचे संज्ञापन व पत्रकारिता विभाग आता पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात अडकले आहे. पत्रकारिता विभागाने यंदाच्या शैक्षणिक वर्षांसाठी तडकाफडकी तीन अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी संख्ये अभावी हे अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला असून कोणतीही पूर्वकल्पना न देता हे अभ्यासक्रम बंद केल्याने अनेकांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर याप्रकरणी युवा सेनेने देखील आक्रमक पवित्रा दाखल केल्याने येत्या काळात हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. तर ही अभ्यासक्रम अद्यावत करण्यासाठी हे अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन व पत्रकारिता विभागातर्फे अनेक अभ्यासक्रम चालविली जातात. यातील पदवी अभ्यासक्रमाच्या जवळपास सर्वच अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची चांगली पंसती असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमाला म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार विभागाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे विभागाकडून पदव्युत्तर अभ्यासक्रमाची तीन अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. सध्या विभागात पाच अभ्यासक्रम सुरू असून त्यात मास्टर ऑफ आर्टस (कॅम्युनिकेशन अ‍ॅण्ड जर्नलिझम), मास्टर ऑफ आर्टस (पब्लिक रिलेशन), मास्टर ऑफ आर्टस (इलेक्शन मिडीया), मास्टर ऑफ आर्टस (टेलिव्हिजन स्टडीज) आणि मास्टर ऑफ आर्टस (फ्लिम स्टडीज) हे अभ्यासक्रम सुरू आहेत. त्यापैकी तीन अभ्यासक्रम एक वर्षांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासंदर्भात नुकतेच विभागाने कुलगुरुंना पत्र लिहून याची कल्पना दिली असून अभ्यासक्रम बंद करण्याची कारणे देखील यावेळी देण्यात आली आहे. ज्यात प्रामुख्याने यातील अनेक अभ्यासक्रम हे बरीच वर्षे जुनी असून त्यात बदलांची आवश्यकता आहे. तर विभागात मनष्युबळ कमी असून फक्त ३ प्राध्यापकांवर विभागाची धुरा आहे. त्यामुळे इतक्या कमी मनुष्यबळात हे अभ्यासक्रम चालविणे शक्य होत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. तर दुसरीकडे काही अभ्यासक्रमांना चांगली मागणी आहे. मात्र विद्यार्थी क्षमता कमी असल्याने अनेकांना परतावे लागत आहे, ज्याचा फटका विद्यापीठाला बसत आहे. त्याशिवाय विभागाला काही प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करुन भांडवल उपल्बध करावयाचा असल्याचे कारण यावेळी देण्यात आले आहे. त्यामुळे हे अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

विभागाने तडकाफडकी हे अभ्यासक्रम बंद केल्याने युवा सेनेकडून याविरोधात आता विद्यापीठाकडे तक्रार केली आहे. युवा सेनेचे कार्यकारणी सदस्य साईनाथ दुगै यांनी यासंदर्भात कुलगुरुकडे यासंदर्भात निवेदन दिल्याचे सांगताना म्हणाले की, मुंबई विद्यापीठाने नुकताच बृहत आराखडाच्या माध्यमातून कौशल्यभिमुख अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तर दुसरीकडे पत्रकारिता विभागाने महत्वाचे असे तीन अभ्यासक्रम बंद करणे ही संतापजनक बाब आहे. त्यामुळे हे अभ्यासक्रम पुन्हा सुरु करण्याची मागणी आम्ही केली असून याकडे दुर्लक्ष केल्यास युवा सेनेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असे आम्ही निवेदनात स्पष्ट केले आहे. तर याबद्दल बोलताना मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे यांच्याकडे संपर्क केला असता आपल्याला या प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती घ्यावी लागेल, त्यानंतरच अधिक माहिती देता येईल, पण अभ्यासक्रम पूर्णपणे बंद होणार नाही, असे त्यांनी स्पषट केले आहे. त्यामुळे येत्या काळात हा मुद्दा चांगलाच गाजणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -