घरमुंबईमुंबईत अवकाळी पावसाचा ड्रायरन

मुंबईत अवकाळी पावसाचा ड्रायरन

Subscribe

थंडी गायब झालेली असली तरीही मुंबई शहरात अनेक भागात आज सकाळच्या सुमारास तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. अनेक भागात धुक्याचे वातावरण असतानाही काही भागात पावसाने तुरळक हजेरी मात्र लावली. मुंबईसह ठाणे, रायगड, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरातही गेल्या २४ तासांमध्ये पावसाची नोंद झाल्याची माहिती प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने जाहीर केली आहे. मुंबईत आज सकाळी काही भागात पावसाची हजेरी लावली असल्यानेच सकाळी घरातून कामासाठी बाहेर पडताना मुंबईकरांची तारांबळ उडाली. आज शुक्रवारी दिवसभर हवामान ढगाळ राहील असा अंदाज हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आला आहे.

- Advertisement -

मुंबईत कुर्ला, माहीम, दादर, परळ, भोईवाडा या परिसरात सकाळच्या सुमारास पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. त्यासोबतच मुंबई महानगर प्रदेशात ठाणे, डोंबिवली यासारख्या भागातही पावसाने हजेरी लावली. पुण्यातही गुरूवारी संध्याकाळच्या सुमारास पाषाण, औंध, शिवाजीनगर, विश्रांतवाडी, पुणे स्टेशन परिसरात ढगांच्या गडगडाटासह तसेच विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.

- Advertisement -

उर्वरीत महाराष्ट्रातही ठाणे, रायगड, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरातही गेल्या २४ तासांमध्ये पावसाची हजेरी लागलेली आहे. पावसाची हीच स्थिती येत्या काही तासांसाठी कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रातील काही भागांमध्ये म्हणजे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भागात पावसाची हजेरी लागणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. येत्या काही तासांसाठी राज्यात पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज हा प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी मांडला आहे. एकुण दहा जिल्ह्यांमध्ये वादळीवाऱ्याची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -