मुंबईकर जबाबदारीने वागले

Mumbai

मुंबईत जमावबंदीचे आदेश, नेमण्यात आलेला मोठ्या प्रमाणातील पोलिसांचा फौजफाटा, मुंबई पोलिसांचे नेटकरांना आवाहन अशा सगळ्या तयारीला मुंबईकरांना चांगला प्रतिसाद दिला आहे. अयोध्या निकालानंतर मुंबईतील अनेक संवेदनशील भागात अतिशय शांततामय असे वातावरण होते. सोशल मिडियावर ट्विटर, फेसबुक आणि वॉट्स एपवरही मोठ्या जबाबदारीने नेटकरांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या. त्यामुळे कुठेही तणावाचे वातावरण किंवा हिंसेची घटना संपुर्ण शहरात घडली नाही.

सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ४० हजार पोलिसांची नेमणुक करण्यात आली होती. गोवंडी, मानखुर्द, दादर, मोहम्मद अली रोड यासारख्या संवेदनशील भागात अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर शुक्रवार रात्री ११ वाजल्यापासूनच जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी सोशल मिडियावर नेटकरांना आवाहन करत शांतता आणि जबाबदारीने आपल्या भावना व्यक्त करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत मुंबईकरांनी आपली जबाबदारी दाखवली.मुंबई तसेच महाराष्ट्रात सोशल मिडियावर येणार्‍या मजकुरासाठी सायबर टीमने मोठी यंत्रणा या कामासाठी नेमली होती.

सोशल मिडियावर एलर्ट जारी करतानाच मुंबई पोलिसांनी अतिरिक्त पोलिस दलाचीही नेमणुक ठिकठिकाणी सावधगिरीचा उपाय म्हणून केली होती. मुंबई तसेच राज्यातील संवेदनशील भागातील एडमिन्सला पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली होती. तसेच ड्रोनच्या माध्यमातूनही अनेक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था व्यवस्थेसाठी बंदोबस्त ठेवण्यात आली.मुस्लिम समाजातील धर्मगुरू, नेते, राजकीय मंडळी तसेच पत्रकारांनाही निकालानंतर संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले होते. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत असे अपेक्षित होते. पण नेटकरांनी अतिशय जबाबदारीने आजच्या निकालावर प्रतिक्रिया दिल्या. मोठ्या प्रमाणात निकालाचे स्वागत करण्यात आले. तसेच देश म्हणून आपण एक आहोत ही भावना नेटकरांमध्ये आज पहायला मिळाली.

राम मंदिरातही आनंदोत्सववडाळा येथील श्रीराम मंदिरातही आजच्या निकालानंतर आनंदाचे वातावरण होते. याठिकाणी मुख्यमंत्री भेट देणार म्हणून सकाळपासूनच पोलिसांचा बंदोबस्त वाढला होता. दोन वेळा याठिकाणी मुख्यमंत्री पोहचण्याची वेळ बदलली. पण अखेर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण व्हायला नको म्हणून काळजीवाहू सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मंदिराला भेट देणे टाळले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here