Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुंबईकर घाबरले! चिकन सोडून भाज्यांच्या दुकानात धाव

मुंबईकर घाबरले! चिकन सोडून भाज्यांच्या दुकानात धाव

नियमित मांसाहार खाणाऱ्या ग्राहकांनी चिकन आणि अंड्यांच्या दुकानावर पाठ फिरवली आहे.

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. अद्याप धोका कमी असला तरी लोकांच्या मनात भिती निर्माण झालेली पहायला मिळत आहे. मुंबईसह इतर भागात काही प्रमाणात पक्ष्यांचा मृत्यू झाल्याने मुंबईकरांनी मांसाहाराला राम राम ठोकलेला पहायला मिळत आहे. अंडी शिकन ७० ते ८० डिग्री वर अर्धा तास शिजवून खाल्ल्याने काहीही धोका नाही असे सांगण्यात आले आहे. मात्र तरीही लोकांमध्ये चिकन विषयी शंका आहे. अनेक जणांनी मांसाहाराला रामराम ठोकून शाकाहाराला प्राधान्य दिले आहे.

बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने एक आठवड्यापासून चिकन खाणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत ३० ते ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. १६० रूपयांना मिळणारे चिकन आता ८० ते ९० रूपये किलो झाले आहे. त्याचप्रमाणे अंड्यांच्या दरातही नगामागे दोन ते तीन रूपयांनी कमी झाले आहेत. नियमित मांसाहार खाणाऱ्या ग्राहकांनी चिकन आणि अंड्यांच्या दुकानावर पाठ फिरवली आहे. लोकांनी फळे, पालेभाज्यांच्या दुकानात एकच गर्दी केली आहे. परंतु मुंबईतील हॉटेल्स आणि रेस्टॉरन्टवर बर्ड फ्लूचा मोठा परिणाम झालेला नाही. फक्त मांसाहार पदार्थ घेणे कमी झाले आहे.

- Advertisement -

चिकन किंवा अंडी खाताना ती ७० ते ८० डिग्रीवर शिजवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ७० अंशापलिकडे बर्ड फ्लूचा विषाणू जिवंत राहू शकत नाही. त्याचप्रमाणे प्राण्यांपासून किंला अंडी खाल्ल्याने त्याचा माणसांना संसर्क होण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे घाबरून जाऊ नये असे आवाहन व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.


हेही वाचा – घाबरू नका! मृत पक्षी, कोंबड्यांची माहिती देण्यासाठी वापरा ‘हा’ हेल्पनाईन क्रमांक

- Advertisement -