घरमुंबईVideo: आरे बचावासाठी मुंबईकर पुन्हा एकवटले

Video: आरे बचावासाठी मुंबईकर पुन्हा एकवटले

Subscribe

आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडसाठी आरेतील झाडे मोठ्या प्रमाणात तोडली जाणार आहेत. यामुळे आरे जंगल संरक्षित राहण्याकरिता मुंबईकर पुन्हा आरे बचावासाठी एकवटले आहेत.

मेट्रो कारशेडमुळे आरेतील झाडांची मोठ्या प्रमाणत कत्तल होणार असून, गेल्या काही वर्षांपासून सेव्ह आरेच्या माध्यमातून विरोध होत आहे. मात्र तरी देखील झोपलेल्या प्रशासनाला जाग येत नसल्याने आज पुन्हा एकदा मुंबईकर रस्त्यावर उतरले. तसेच सीएसटी स्टेशन व्यतिरिक्त मुंबईच्या विविध भागात मेट्रो प्रकल्पाला विरोध करण्यात आला आहे. यावेळी आरे बचावचा लढा हा पूर्ण आरे जंगल संरक्षित करण्याचा असल्याचे सेव्ह आरेच्या सदस्यांनी सांगितले. दरम्यान मेट्रो कारशेड, मेट्रो भवन, प्राणी संग्रहालय, आर टी ओ कार्यालय, SRA या सगळ्याला मुंबईकरांचा विरोध असल्याचे देखील सांगण्यात आले.

आरे बचावसाठी मुंबईकर पुन्हा एकवटले

मेट्रो कारशेडमुळे आरे तील झाडांची मोठ्या प्रमाणत कत्तल होणार असून, गेल्या काही वर्षांपासून सेव्ह आरेच्या माध्यमातून विरोध होत आहे. मात्र तरी देखील झोपलेल्या प्रशासनाला जाग येत नसल्याने आज पुन्हा एकदा मुंबईकर रस्त्यावर उतरले.

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 31, 2019

- Advertisement -

काय आहे मुख्य मागणी?

सेव्ह आरेची मुख्य मागणी आरे पुन्हा “No Development Zone ” करण्याची असून,
मेट्रो शेड तर थांबवूच पण इतर कुठल्याही प्रोजेक्टला आत घुसू देणार नाही असा इशारा देखील देण्यात आला. तसेच लाखो मुंबईकरांच्या विरोधानंतरही पालिकेने आरे जंगलातील जवळजवळ २७०० पुरातन वृक्ष कापून टाकण्याचे फर्मान काढले आहे. लोकशाहीच्या विरोधात असलेल्या या कृत्याचा आताच निषेध करणे आवश्यक आहे. ह्या वृक्षांच्या खुनाचा स्वीकार नका करू असे आवाहन देखील त्यांनी मुंबईकरांना केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -