घरमुंबईप्रिन्सच्या मदतीसाठी मुंबईकरांची धाव

प्रिन्सच्या मदतीसाठी मुंबईकरांची धाव

Subscribe

केईएम हॉस्पिटलमध्ये शॉर्टसर्किटमुळे गंभीररित्या जखमी झालेल्या प्रिन्सच्या मदतीसाठी मुंबईकर पुढे सरसावले आहेत.

हृदयातील छिद्रामुळे अडीच महिन्याच्या काळजाच्या तुकड्याला मुंबईत मोठ्या आशेने घेऊन आलेल्या राजभर कुटुंबातील प्रिन्सला आता जन्मभरासाठी अंपगत्व आलं आहे. हृदयाच्या छिद्राच्या उपचारांसाठी आलेल्या प्रिन्सचा हात काढण्यात आला आहे. यामुळे, प्रिन्सचे वडील पन्नालाल राजभर व्यथित झाले आहेत. दरम्यान, त्यांच्यावर कोसळलेल्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी मुंबईकर पुढे सरसावले आहेत. तसंच, विविध सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था राजभर यांना मदतीचे आवाहन करत आहेत.

पन्नालाल राजभर यांनी मुंबईकरांचे मानले आभार 

बुधवारी रात्री एका व्यक्तीने तर अडीच हजार रुपये पन्नालाल यांच्या खिशात ठेऊन गेल्याचे ते सांगतात. प्रिन्सच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी अनेक महाविद्यालयाचे विद्यार्थी येत आहेत. तसेच, काही मुंबईकरही मदतीसाठी विचारणा करत आहेत. या मदतीबद्दल पन्नालाल राजभर यांनी मुंबईकरांचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

मुलाच्या काळजीने अभ्यासही राहिला अपूर्ण 

सध्या पन्नालाल राजभर हे बेरोजगार आहेत. प्रिन्सची काळजी घेताना भावाची आणि भावोंजीची मदत होत आहे. कुटुंबाला आर्थिक आधार असलेले सदस्य सध्या मुंबईत ठाण मांडून आहेत. येत्या ७ डिसेंबर रोजी पन्नालाल राजभर यांची पॉलिटेक्निकलची परिक्षा असून मुलाच्या काळजीने अभ्यासही अपूर्ण राहिला आहे. मुलाच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण झाला असून पुन्हा गावी गेल्यावर उपजिविकेचा प्रश्न उपस्थित झाला असल्याचे राजभर म्हणाले.

नेमकं काय घडलं?

केईएम हॉस्पिटलच्या बालरोग विभागात गेल्या बुधवारी मध्यरात्री अचानक शॉर्टसर्किट झालं. या घटनेत केईएममध्ये हृदयावर उपचार घ्यायला आलेला अडीच महिन्यांचा चिमुरडा प्रिन्स गंभीररित्या जखमी झाला. प्रिन्स हा उत्तर प्रदेशमधून मुंबईत दाखल झाला आहे. तर, या आगीच्या लोटात अडकल्याने बाळाचा एक हात आणि एका बाजूचा चेहरा भाजला आहे. त्याच्या हाताला संसर्ग झाल्यामुळे शस्त्रक्रिया करुन प्रिन्सचा हात काढण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शिका आरोग्याची एबीसीडी आणि रहा फिट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -