Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई ऐन हिवाळ्यात उकाडा वाढल्याने मुंबईकर हैराण

ऐन हिवाळ्यात उकाडा वाढल्याने मुंबईकर हैराण

हिवाळ्यात एप्रिल मे सारख्या गर्मीचा सामना

Related Story

- Advertisement -

देशात उत्तरेकडील शहरांत थंडीचा पारा वाढतच चालला आहे. तर मुंबईत ऐन हिवाळ्यात उकाडा वाढला आहे. त्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. मुंबईत मंगळवारी ३५.३ अंश सेल्स‌िअस तापमानासह आतापर्यंत सर्वात जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी तापमानात थोड्या प्रमाणात घसरण झाली आहे. बुधवारी मुंबईमध्ये ३४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी जानेवारी महिन्यात ३४.५ अंश सेल्सिअस तापामानाची नोंद करण्यात आली होती. यावर्षी तापमानात वाढ झाल्याचे दिसत आहे. मुंबईकर हिवाळ्यात एप्रिल मे सारख्या गर्मीचा सामना करत आहेत.

प्रादेशिक हवामान खात्याचा सांताक्रूझ विभागाने बुधवारी कमाल तापमान ३४.६ डिग्री अंश सेल्सिअस तापामानाची नोंद केली आहे. हे तापमान सामान्य तापामनापेक्षा ४ अंश सेल्सिअस जास्त आहे. आईएमडीच्या एका ज्येष्ठ शास्त्रज्ञाने सांगितले की, शीतलहरी उत्तर प्रदेशातून येणार्‍या थंड हवेमुळे सामान्यत: राज्य आणि शहरात दिसून येतात. परंतु यावर्षी वाऱ्याची दिशेत बदल झाला आहे. तेलंगणा आणि तामिळनाडूच्या उष्ण वाऱ्यामुळे तापमानात वाढ होत आहे. हवामान मूल्यांकन करणारी खासगी संस्था स्कायमेटचे महेश पलावत म्हणाले की, येत्या दोन दिवसांत रात्रीचा पारा कोसळण्यास सुरूवात होईल आणि रात्रीच्या थंडीत वाढ होईल.

किमान तापमानातही वाढ

- Advertisement -

बुधवारी किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त होते. सांताक्रूझ येथे किमान तापमान २२ अंश सेल्सिअस नोंदले गेले जे सामान्य तापमानापेक्षा जास्त होते. बुधवारी कुलाब्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. हे तापमान सामान्य तापमानापेक्षा ५ अंश सेल्सिअस अधिक होते.

- Advertisement -